नवी दिल्ली : कोरोना विषाणूविरोधातील लढाईत कोरोना लसीकरण (Corona Vaccination) हे मोठं अस्त्र आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचावासाठी देशात 15 ते 18 वयोगटातील तरुणांचे लसीकरण, तसंच कोरोना योद्धे आणि वयोवृद्धांना बुस्टर डोस (Buster Dose) देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यापाठोपाठ आता 12 ते 14 वयोगटातील मुलांना मार्चपासून कोरोना लस दिली जाणार असल्याची माहिती मिळतेय. केंद्र सरकारच्या (Central Government) कोरोना वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोडा यांनी सोमवारी सांगितलं की भारत या वर्षी मार्चपर्यंत 12 ते 14 वर्षातील मुलांचं लसीकरण सुरु करण्यात येईल.
डॉ. अरोडा म्हणाले की 15 ते 18 वयोगटातील तरुणांचे लसीकरण झाल्यानंतर, सरकार मार्चमध्ये 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी अभियान राबवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 12 ते 14 वयोगटातील मुलांची संख्या साधारण साडे सात कोटी आहे. तर 15 ते 18 वयोगटातील अंदाजे 7 कोटी 40 लाख मुलांपैकी पावणे चार कोटी मुलांना आतापर्यंत कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यांना 28 दिवसांनंतर कोरोना लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.
15 ते 18 वयोगटातील तरुणांच्या लसीकरण प्रक्रियेत तरुण मोठ्या प्रमाणात भाग घेत आहेत. लसीकरणाचा वेग पाहता या वयोगटातील उर्वरित तरुणांना जानेवारीच्या अखेरपर्यंत कोरोना लसीचा पहिला डोस दिला जाईल. तर फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत त्यांना कोरोना लसीचा दुसरा डोसही दिला जाण्याची शक्यता डॉ. अरोडा यांनी व्यक्त केलीय. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी ट्वीट करत 3 जानेवारी ते आतापर्यंत 15 ते 18 वयोगटातील साडे तीन कोटी पेक्षा अधिक तरुणांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला गेल्याचं सांगितलं. देशात आतापर्यंत 157 कोटीपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत.
Amazing enthusiasm among Young India for #COVID19 vaccination ?
Over 3.5 crore children between the 15-18 Age group have received 1st dose of COVID-19 vaccine, since 3rd January.
Congratulations to all my young friends who have got vaccinated.#SabkoVaccineMuftVaccine pic.twitter.com/4sa8DzCIJ4
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) January 17, 2022
मुंबईत आज दिवसभरात 5 हजार 956 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 4 हजार 944 रुग्णांना कुठलीही लक्षणं नाहीत. तर 479 जण आज रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसंच दिवसभरात 15 हजार 551 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईत आज 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 93 टक्के इतका आहे. तर रुग्णवाढीचा दर केवळ 1.22 टक्के आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 55 दिवसांवर गेला आहे.
#CoronavirusUpdates
१७ जानेवारी, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण- ५९५६
२४ तासात बरे झालेले रुग्ण-१५५५१
बरे झालेले एकूण रुग्ण-९३५९३४
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९३%एकूण सक्रिय रुग्ण- ५०७५७
दुप्पटीचा दर- ५५दिवस
कोविड वाढीचा दर (१०जानेवारी- १६ जानेवारी)-१.२२%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 17, 2022
पुण्यात आज दिवसभरात 3 हजार 959 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 3 हजार 67 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. तर पुणे शहरातील 6 आणि पुण्याबाहेरील 6 अशा एकूण 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या 35 हजार 73 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
पुणे कोरोना अपडेट : सोमवार, दि. १७ जानेवारी २०२२
◆ उपचार सुरु : ३५,०७३
◆ नवे रुग्ण : ३,९५९ (५,६३,५०८)
◆ डिस्चार्ज : ३,०६७ (५,१९,२८८)
◆ चाचण्या : १५,६३० (४१,२२,२४४)
◆ मृत्यू : ६ (९,१४७)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/V8OSfJ5FnZ— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 17, 2022
इतर बातम्या :