नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये (Corona Cases) थोडी घट झाल्याचं दिसून आलं आहे.मात्र,कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या वाढलीय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासात 1 लाख 68 हजार 63 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर 277 जणांचा मृत्यू (Corona Deaths)झालाय. ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील वाढली असून 4 हजार 461 वर पोहोचली आहे.
देशात गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 68 हजार 63 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 277 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी 8 लाख 21 हजार 446 वर पोहोचली आहे.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार केवळ 3 राज्यांमध्ये 19 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्लीचा समावेश आहे. महाराष्ट्रात 33 हजार 470, पश्चिम बंगालमध्ये 19 हजार 286 , दिल्लीमध्ये 19 हजार 166 रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडू राज्यात 13 हजार 990 आणि कर्नाटकमध्ये 11 हजार 698 रुग्णांची नोंद झाली आहे. नव्या रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.
COVID-19 | India reports 1,68,063 fresh cases, 69,959 recoveries & 277 deaths in the last 24 hours
Active case tally reaches 8,21,446. Daily positivity rate (10.64%)
Omicron case tally at 4,461 pic.twitter.com/ikKRh2Xh6G
— ANI (@ANI) January 11, 2022
एकीकडे कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील वाढत आहे. ओमिक्रॉन वेरियंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 4461 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात काल राज्यात 31 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.सर्वाधिक 28 रुग्णांची पुण्यात नोंद झालीय. पुणे ग्रामीण 2 पिंपरी चिंचवडमध्ये 1 रुग्ण सापडलाय. आतापर्यंत राज्यात 1247 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.467 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे. ओमिक्रॉन संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राजस्थान, दिल्ली, कर्नाटक, केरळ, आणि गुजरातमध्येही ओमिक्रॉनचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत.
इतर बातम्या:
Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : भारतात 1 लाख 68 हजार 63 कोरोना रुग्णांची नोंद
Corona virus india 168063 new cases and 277 deaths reported in the last 24 hours omicron variant cases reach to four thousand four hundred