नवी दिल्ली: देशात कोरोना (corona virus cases) विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होतेय. गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शनिवारच्या तुलनेत रविवारी 20 हजार रुग्णांची वाढ झालीय. देशात गेल्या 24 तासात 1 लाख 79 हजार 723 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर 146 जणांचा मृत्यू झालाय. ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील वाढली असून 4 हजार 33 वर पोहोचली आहे.
देशात गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 79 हजार 723 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 146 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी 7 लाख 23 हजार 619 वर पोहोचली आहे. देशात कोरोना रुग्णसंख्येचा पॉझिटीव्हीट दर 13.29 वर पोहोचला आहे.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार केवळ 5 राज्यांमध्ये 65 टक्के रुग्ण आढळले आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली. तामिळनाडू आणि कर्नाटकचा समावेश आहे. महाराष्ट्रात 44 हजार 388, पश्चिम बंगालमध्ये 24 हजार 287 , दिल्लीमध्ये 22 हजार 751, तामिळनाडू राज्यात 12 हजार 895 आणि कर्नाटकमध्ये 12 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. नव्या रुग्णसंख्येपैकी 24.7 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
COVID19 | India reports 1,79,723 fresh cases & 146 deaths in the last 24 hours
Active case tally reaches 7,23,619. Daily Positivity rate at 13.29%
Omicron case tally at 4,033 pic.twitter.com/bOTWBFwuxN
— ANI (@ANI) January 10, 2022
आयसीएमआरच्या माहितीनुसार रविवारी देशभरात 13.52 लाख नमुन्यांची चाणी करण्यात आली. त्यापैकी 1 लाख 79 हजार नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं रविवारचा पॉझिटीव्हीटी रेट 13.29 टक्क्यांवर पोहोचला. तर, आठवड्याचा पॉझिटीव्हीटी रेट 7.92 टक्केंवर पोहोचला आहे.
एकीकडे कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील वाढत आहे. ओमिक्रॉन वेरियंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 4033 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 1552 रुग्ण बरे देखील झाले आहेत. ओमिक्रॉन संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येपैकी 1216 रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राजस्थानमध्ये 529, दिल्लीमध्ये 513, कर्नाटकमध्ये 441, केरळमध्ये 333 आणि गुजरातमध्ये 236 रुग्णांची नोंद झालीय. तर, 27 राज्य आणि केंद्र शासीत प्रदेशात या रुग्णांची नोंद झालीय. रविवारी ओमिक्रॉनच्या 410 रुग्णांची नोंद झाली त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले.
इतर बातम्या:
पुण्यात कोरोना नियम धाब्यावर, मंडई चौकात खरेदीसाठी तुफान गर्दी
Corona virus india 179723 new cases and 146 deaths reported in the last 24 hours omicron variant cases reach to four thousand