Corona Cases India : देशात 2 लाख 38 हजार नवे रुग्ण, ओमिक्रॉनबाधितांची संख्या 9 हजारांच्या उंबरठ्यावर

| Updated on: Jan 18, 2022 | 9:48 AM

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांमध्ये 2 लाख 38 हजार 18 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

Corona Cases India : देशात 2 लाख 38 हजार नवे रुग्ण, ओमिक्रॉनबाधितांची संख्या 9 हजारांच्या उंबरठ्यावर
कोविड
Follow us on

नवी दिल्ली: कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढल्यानं अनेक राज्यांनी निर्बंध लागू केले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशात अडीच लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत होती. मात्र, गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचं दिसून आलं आहे. देशात गेल्या 24 तासात 2 लाख 38 हजार 018 रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारच्या तुलनेत आज आलेल्या आकडेवारीमध्ये 20 हजार रुग्णांची घट नोंदवण्यात आलीय. तर, मृतांची संख्या देखील कमी झालीय. दिवसभरात 310 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. 24 तासात 1 लाख 57 हजार 421 जण कोरोना मुक्त झाले आहेत. देशात सध्या 17 लाख 36 हजार 628 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हीटी रेट देखील कमी होत 14.43 वर आला आहे. देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 8891 वर गेली आहे.

कोरोना मुक्त होणारांची संख्या वाढली

गेल्या 24 तासात 1 लाख 57 हजार 421 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी 2 लाख 38 हजार 018 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या 24 तासात 310 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 4 लाख 86 हजार 761 वर पोहोचलाय.

ओमिक्रॉन बाधितांची संख्या 9 हजारांच्या उंबरठ्यावर

देशातील ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील वाढली असून 8 हजार 891 वर पोहोचली आहे. तर, राज्यात सोमवारी ओमिक्रॉनच्या 122 रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात 40, मीरा भाईंदर 29, नागपूर 26, औरंगाबाद 14, अमरावती 7, मुंबईत 3 रुग्ण आढळले आहेत. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 1860 वर पोहोचली आहे. तर, 959 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची स्थिती काय?

सोमवारी राज्यात 31 हजार 111 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 24 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 29 हजार 092 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 68 लाख 29 हजार 992 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 94.3 टक्केवर पोहोचला आहे.तर, राज्यातील मृत्यूदर 1.95 वर पोहोचला आहे.

इतर बातम्या:

Corona Vaccination : मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचं लसीकरण, 15 ते 18 वयोगटातील 3.5 कोटी तरुणांचे लसीकरण पूर्ण

Corona Cases India : देशात 2 लाख 58 हजार नवे रुग्ण, मृत्यूसंख्येत वाढ झाल्यानं टेन्शन वाढलं

Corona virus india 238018 new cases and 310 deaths reported in the last 24 hours omicron variant cases crosses eight thousand