नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेश राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आलेत. काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असं असतानाही काही लोक नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. प्लाईट आणि बसमध्येही लोक कोरोना नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. अशावेळी DGCAने कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नवे नियम लागू केले आहेत. यात्रेकरुंना विमानतळ आणि विमान प्रवासात हे नियम पाळणं गरजेचं असणार आहे. या नियमांचं पालन केलं नाही तर तुमच्या विमान प्रवासावर बंदी येऊ शकते. (Violation of corona rules at the airport will result in major action, the DGCA said)
लोक मास्कचा वापर तर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण तो योग्यरित्या लावण्यात येत नाही. त्यावर DGCAने म्हटलंय की, मास्क लावणं तर बंधनकारक आहेच. पण तो योग्यरित्या लावणं गरजेचं आहे. विमान प्रवास करताना मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अनिवार्य आहे. गरज असेल तरच मास्क नाकाच्या खाली घेतला जाऊ शकतो.
विमानतळावर एकही व्यक्ती मास्कविना प्रवेश करणार नाही, याची जबाबदारी आता CISF कडे देण्यात आली आहे. सोबतच एअरपोर्ट मॅनेजर/टर्मिनल मॅनेजर प्रवाशाने मास्क योग्यरित्या लावला आहे की नाही, याचीही पाहणी करतील.
— DGCA (@DGCAIndia) March 13, 2021
जर एखादा प्रवासी कोरोना नियमांचे पालन करत नसेल तर त्याला विमानातून उतरवलं जाऊ शकतं. त्याला सुरक्षा यंत्रणेकडे सोपवलं जाईल. सुरुवातीला प्रवाशाला सुचना दिली जाईल, त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती DGCAने दिली आहे.
एखादा प्रवासी यात्रे दरम्यान नियमांचं पालन करत नसेल तर त्याच्यासोबत ‘उपद्रवी यात्री’ प्रमाणे व्यवहार केला जाईल. अशावेळी तुम्ही विमान प्रवास करत असाल तर तुम्हाला या नियमांचे पालन करणं गरजेचं असणार आहे. तुम्ही नियमांचं पालन केलं नाही आणि उपद्रवी यात्रेकरुच्या लिस्टमध्ये तुम्ही आलात तर तुमच्या विमान प्रवासावर बंदी लावली जाऊ शकते. इतकच नाही तर अशा केसमध्ये शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कोरोना पॉझिटिव्ह, एम्स रुग्णालयात दाखल
Corona Update : भारतातील 8 राज्यांनी चिंता वाढवली, महाराष्ट्रासह कोणत्या राज्यांचा समावेश?
Violation of corona rules at the airport will result in major action, the DGCA said