मुंबई : कोरोना लसीकरणासंदर्भात (coronavirus vaccine) भारतीयांसाठी (India)महत्त्वाची बातमी आहे. भारताकडून ऑक्सफोर्ड / अॅस्ट्रॅजेनेकाच्या कोरोनाव्हायरस लसीला तातडीच्या वापरासाठी पुढील आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ब्रिटीश औषध निर्मात्याच्या लसीसाठी हिरवा कंदील देणारा भारत हा पहिला देश असू शकतो. फायझर इंक आणि स्थानिक कंपनी भारत बायोटेक यांनी तयार केलेल्या लसींसाठी ही आपत्कालीन वापराच्या अधिकृतता अर्जांवर विचार सुरू आहे. त्यामुळे लवकरच भारतीयांना कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे. (coronavirus vaccine Oxford is expected to be approved for immediate use by India next week)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी उत्पन्न असणार्या देशांसाठी आणि गरम हवामानातील नागरिकांसाठी अॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफोर्ड लस महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण ती लस स्वस्तही आहे. सोबतच लसीचे वाहतुकीकरण करणं सोपं आहे आणि सामान्य फ्रिज तापमानात दीर्घकाळ साठवलीही जाऊ शकते. त्यामुळे या लसीचा भारतीयांना फायदा होईल अशीही माहिती समोर येत आहे.
खरंतर, एकीकडे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक कोटीच्या पुढे गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला काही देशांमधील नियंत्रणात आलेली कोरोनाची परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाऊ लागली आहे. अशा परिस्थितीत देशातील नागरिकांचे लक्ष कोरोनावरील लस कधी येणार याकडे लागले आहे. यात नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात (पुढील आठवड्यात) कोरोनावरील लसीची पहिली खेप राजधानी दिल्लीत दाखल होणार आहे. दरम्यान, ही लस कोणत्या कंपनीची असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याविषयी सरकार किंवा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दिल्लीतल्या राजीव गांधी रुग्णालयात कोरोनावरील लस ठेवण्याची तयारी सुरू आहे. लसीचा साठा करता यावा यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणादरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. कोरोना व्हॅक्सिन केंद्रासाठी दिल्लीत दोन जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचाही समावेश आहे.
कोल्ड स्टोरेजद्वारे दिल्लीत 600 ठिकाणी कोरोना लस देण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. राजीव गांधी रुग्णालयाच्या तळ मजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर डिप फ्रिझर, कुलर, कोल्ड स्टोरेज बॉक्स आणि लसीचा साठा करुन ठेवण्यासंबंधीची इतर सामग्री ठेवण्यात आली आहे. 15 डिसेंबरपूर्वीच ही तयारी पूर्ण झाली आहे. आता केवळ लसीची पहिली खेप कधी येणार याकडे लक्ष लागले आहे. (coronavirus vaccine Oxford is expected to be approved for immediate use by India next week)
इतर बातम्या –
New Corona Strain : ब्रिटनहून आलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह, प्रवाशांवर सरकारची नजर
भारतात 69 टक्के लोक म्हणतात, लसीकरणाची गरज नाही!, जाणून घ्या काय आहे कारण?
video | Special Report | Corona strain | कोरोना स्ट्रेनला जग का घाबरतंय?https://t.co/03tl4IfvvQ#CoronavirusStrain
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 22, 2020
(coronavirus vaccine Oxford is expected to be approved for immediate use by India next week)