शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, कशी असते धर्मगुरुंच्या समाधीची प्रक्रिया?

| Updated on: Sep 12, 2022 | 3:08 PM

भू समाधी ही संन्यासींनाच दिली जाते. शिवाय गुरुंच्या समाधीजवळच किंवा त्यांच्या मठात समाधी दिली जाते. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनाही त्यांच्या आश्रमात भूमी समाधी देण्यात येणार आहे. पद्मासन किंवा सिद्धासनाच्या मुद्रेत बसून त्यांना समाधी दिली जाणार आहे.

शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, कशी असते धर्मगुरुंच्या समाधीची प्रक्रिया?
हिंदू धर्मगुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन
Follow us on

मुंबई : हिंदूचे सर्वात मोठे (Religious leader) धर्मगुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे रविवारी मध्यप्रदेशातील नरसिंगपूर येथील आक्षमात वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. अखेर 99 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. घटनेच्या 24 तासानंतर म्हणजेच सोमवारी दुपारी नरसिंहपूर येथील गोटेगाव येथील ज्योतेश्वर येथील परमहंसी (Ganga Ashram) गंगा आश्रमात त्यांना ‘भूमी समाधी’ देण्यात येणार आहे. या विधीसाठी दोन तास लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. धर्मगुरुंच्या निधनानंतर भूमी समाधीला वेगळे महत्व असून नेमकी ही प्रक्रिया असते कशी हेच आपण जाणून घेणार आहोत.

म्हणून भू समाधी..!

हिंदू धर्मामध्ये सहसा मृत्यूनंतर जाळले जाते. मात्र, संत संताचे अंत्यसंस्कार हे वेगळे असतात. त्यांना जाळले जात नाहीतर भूमीसमाधी दिली जाते. यामागेही एक कारण आहे. संत हे संन्यासी होण्यापूर्वीच स्वत:ला दान देऊन टाकतात. त्यामुळे त्यांचा आत्मा हा इतर सर्वसामान्यांप्रमाणे भटकंती करीत नाही. त्यामुळे त्यांना जाळून टाकण्याची गरज नाही. म्हणून भू समाधी म्हणजेच जमिनीच पुरले जाते.

भू समाधीची प्रक्रीया कशी?

सन्यांसींचा भावना ही परोपरकाराची असते. त्यांच्या शरीराचा उपयोग देखील परोपकारासाठीच केला जातो. भू समाधी ही सात टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाते.
– मृदेहाला अगोदर गंगेतील पवित्र पाण्याने अंघोळ घातली जाते
– शरीर पायथ्याला बसवलेले असते
– त्यानंतर सर्व अंगाला भस्म लावले जाते
– ही सर्व प्रक्रिया झाल्यावर समाधीस्थळी बसवले जाते.
– त्याच ठिकाणी नवीन कपडे घातले जातात. तर हार, तुरे, चंदन हे अर्पन केले जाते.
– त्यानंतर सर्व शरीर हे झाकले जाते
– शेवटी समाधीवर शेणाचा लेप लावला जातो.

कोणत्या अवस्थेत भू समाधी?

भू समाधी ही संन्यासींनाच दिली जाते. शिवाय गुरुंच्या समाधीजवळच किंवा त्यांच्या मठात समाधी दिली जाते. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनाही त्यांच्या आश्रमात भूमी समाधी देण्यात येणार आहे. पद्मासन किंवा सिद्धासनाच्या मुद्रेत बसून त्यांना समाधी दिली जाणार आहे.

समाधीनंतर पुढे काय होते ?

समाधी घेतल्यानंतर 16 दिवसांनी त्या ठिकाणी एक कार्यक्रम पार पाडला जातो. त्यापूर्वी दरम्यानच्या काळात मठाचे सर्व पदाधिकारी हे उत्तराधिकारी यांची निवड करतात. व या कार्यक्रमानंतर त्या मठाचा कारभार ज्यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली आहे त्यांच्याकडे सोपवला जातो. स्वामी स्वरूपानंद यांनी उत्तराधिकाऱ्यांची घोषणा पू्र्वी तर केली नव्हती. पण त्यांच्या इच्छा पत्रात त्याचा उल्लेख असे सांगितले जाते.