कोलकाता – मंदिरात प्रचंड (Escon Temple)उष्णता (due to heat) आणि गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे पाच जणांचा (five death) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना प. बंगालमध्ये रानीहाटी येथीस इस्कॉन मंदिरात घडली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत, या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले आहे की- पानीहाटीच्या इस्कॉन मंदिरात दंड महोत्सवात उष्णता आणि आर्द्रतेमुळे ३ भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून दु:ख झाले आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत, प्रत्येक आवश्यक मदत कार्य करण्यात येते आहे.
Distressed to know of 3 old devotees’ death due to heat and humidity in Danda Mahotsav at ISKCON temple at Panihati. CP and DM have rushed, all help being provided. My condolences to the bereaved families, solidarity to devotees.
हे सुद्धा वाचा— Mamata Banerjee (@MamataOfficial) June 12, 2022
उत्तर २४ परगणा जिल्ह्यात पानीहाटीमध्ये मोहत्सवला घाटावर या कार्य़करमासाठी मोठी गर्दी उसळली होती. दंड महोत्सवात दही चूडा कार्यक्रमासाठी ही गर्दी झाली होती. कोरोना महामारीच्या कारमामुळे दोन वर्षांनी या कार्यक्रमाला परवानगी मिळाली होती. त्यामुळे कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. त्याचबरोबर उष्णता आणि आर्दताही जास्त होती, कार्यक्रमाच्या उष्णतेमुळे थोडा गोंधळ उडाला, त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर पन्नास जण आजारी पडल्याची माहिती मिळाली आहे.
सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ उर्फ केले यांचा गेल्या काही दिवसांपूर्वी याच कारणामुळे कोलकात्यात मृत्यू झाला होता. उष्णता आणि आर्द्रतेमुळे त्यांना कार्डियल अटॅक आल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर त्यांना तातडीने कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. ज्या सभागृहात कार्यक्रम होता, तिथे एसी कमी होते आणि गर्दी जास्त असल्यामुळे आर्द्रता वाढली होती, असे सांगण्यात आले. त्यामुळेच केके यांची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येते आहे.