फेंगल चक्रीवादळाचा तडाखा, अनेक घरांचं नुकसान; तीन जणांचा मृत्यू

| Updated on: Dec 02, 2024 | 5:35 PM

फेंगल चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पत्रे उडून गेली. भारतीय लष्कराने पुरात अडतलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. घरांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सैन्याने ही मोहीम राबवली. कारण बऱ्याच ठिकाणी पाण्याची पातळी पाच फुटांच्या वर गेली होती.

फेंगल चक्रीवादळाचा तडाखा, अनेक घरांचं नुकसान; तीन जणांचा मृत्यू
Follow us on

फेंगल चक्रीवादळामुळे उत्तर तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. जो आज सकाळपासून सुरू आहे. फेंगल चक्रीवादळ शनिवारी पुद्दुचेरीच्या किनाऱ्याजवळ पोहोचले. चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस सुरु होता. वारे वाहत होते त्यामुळे चेन्नई विमानतळ बंद करावे लागले होते. पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं. चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन आज पहाटे ४.०० वाजल्यापासून विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

तीन जणांचा मृत्यू

चक्रीवादळ फेंगलमुळे चेन्नईमध्ये ही मुसळधार पाऊस झाला. वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले होते. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये कोणतेही मोठे नुकसान झाल्याची माहिती सध्या तरी नाही. भारतीय सैन्याने पूरग्रस्त भागात लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.

IMD ने सांगितले की, फेंगल चक्रीवादळ रविवारी रात्री 2 च्या सुमारास भारताच्या किनारपट्टीवर आदळले. लँडफॉलनंतर, फेंगल चक्रीवादळ पश्चिम-नैऋत्य दिशेकडे सरकण्याचा अंदाज आहे. पुढील काही तासांत ते हळूहळू कमकुवत होईल,

केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या 24 तासांत तामिळनाडूतील धर्मापुरी येथे 162 मिमी, सेलममध्ये 60 मिमी आणि तिरुपत्तूरमध्ये 73 मिमी पावसाची नोंद झाली आहे. केरळच्या कोचीनमध्ये 146 मिमी तर कोझिकोडमध्ये 70 मिमी पाऊस झालाय. उद्यापर्यंत तामिळनाडूमधील पावसाची सक्रियता कमी होऊ शकते. केरळमध्ये 4 डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

छत्तीसगडमध्ये हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याचे कमाल तापमान दोन दिवसांत १ ते ३ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. ४ किंवा ५ डिसेंबरपासून किमान तापमानात १ ते ३ अंशांनी वाढ होऊ शकते. राज्यात धुके, थंडीची लाट आणि थंडीचा प्रभाव वाढणार आहे. वाढत्या थंडीमुळे बलरामपूर आणि मनेंद्रगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

विमानाचा अपघात टळला

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, विमान कसे लँडिंग करण्याचा प्रयत्न करते, परंतु प्रतिकूल परिस्थितीमुळे ते पुन्हा हवेत जाते. ऐनवेळी लँडिंग रद्द करत विमान पुन्हा उड्डाण घेते.