चेन्नई | 4 डिसेंबर 2023 : भारतीय किनारपट्टीवर ‘मिचौंग’ चक्रीवादळ सुरु झाले आहे. या चक्रीवादळामुळे तामिळनाडूत मुसळधार पाऊस सुरु आहे. रस्ते पाण्यात गेले आहे. रस्त्यांवर असलेल्या गाड्या पाण्यात वाहून जात आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारने सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. विमानतळ पाण्यात बुडाले आहे. यामुळे अनेक विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. पावसामुळे राज्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. चक्रीवादळ पाच डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या वादळामुळे किनारपट्टीवर ११० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे.
ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनच्या परिसरात 35 ते 80 किमी वेगाने वारे वाहत आहे. यामुळे लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी 1913 हा क्रमांक राज्य सरकारने दिला आहे. राज्यात मंगळवारीसुद्धा मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाचे उपमहानिदेशक बालचंद्रन यांनी म्हटले की, चेन्नई, चेंगलपट्टू आणि कांचीपूरम जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. या भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. चेन्नईमधील शहरवाहतूक बंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे बससेवा बंद करावी लागत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
I've seen neighbors fighting bitterly over parking spaces. When you build indiscriminately without respecting nature or the environment, one day, nature will hit back. This isn't from my neighborhood, though. A friend sent me this footage. #ChennaiRains pic.twitter.com/022RXBB7pD
— Suby #ReleaseSanjivBhatt (@Subytweets) December 4, 2023
चक्रीवादळ पाच डिसेंबर रोजी आंध प्रदेशातील किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यावेळी १०० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुडुचेरीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. केंद्र शासानाने एनडीआरएफच्या २१ टीम तैनात केल्या आहेत. तसेच ‘मिचौंग’चक्रीवादळामुळे 118 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची टीम तयार ठेवली आहे. राज्यात 4,967 बचाव शिबिर तयार केले आहे.
पावसामुळे चेन्नई विमानतळावरुन विमानांचे उड्डान रविवारी रात्री ११ वाजेपासून बंद करण्यात आले आहे. आतापर्यंत ७० विमानांचे उड्डान रद्द केले आहे. चेन्नई महानगरपालिकेचे कर्मचारी ठिकाठिकाणी साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.