अरे देवा काय दिवस आलेत, श्रद्धांजली सभेत बॉलिवूड गाण्यांवर डान्स

| Updated on: Mar 21, 2024 | 7:17 PM

या जगाने आजपर्यंत अनेक घटना पाहिल्या असतील ज्या याआधी कधीच घडल्या नसतील. सोशल मीडियामुळे या घटना लोकांपर्यंत पोहोचतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका श्रद्धांजली सभेत एक तरुणी चक्क बॉलिवूड गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे.

अरे देवा काय दिवस आलेत, श्रद्धांजली सभेत बॉलिवूड गाण्यांवर डान्स
Follow us on

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. दररोज शेकडो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे चांगला कंटेंट असतात तर काही व्हिडिओ आजच्या समाजाची झालेली परिस्थिती दाखवतात. सध्या असाच एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच थक्क व्हाल. कारण अशी घटना तुम्ही याआधी कधीच पाहिली नसेल. समाज किती खालच्या स्तराला चाललाय याची कल्पना तुम्हाला या व्हिडिओ वरुन येऊ शकते.

आजपर्यंत आपण अनेकांच्या श्रद्धांजली सभेला गेला असाल. त्या ठिकाणी एक दु:खाचे वातावरण असते. शांतता असते. ज्याच्या कुटुंबातील व्यक्ती गेला आहे त्याला लोकं धीर देताना आपण पाहिले असेल. मात्र आता वेगळ्याच प्रकारची श्रद्धांजली सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत मागे दोन वृद्ध दाम्पत्याचा फोटो असलेला बॅनर आहे. ज्यामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. पण जेथे हा बॅनर लावला आहे. त्या स्टेजवर मात्र एक मुलगी बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर करण्यात आला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. काही लोकं या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ कुठला आहे हे अजून पुढे आलेले नाही. पण यावर लोकं निंदा करत आहेत. या जगात अजून काय काय पाहायला मिळेल अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.