नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्र महासभेने भारताच्या हिंदी भाषा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यासह उर्दू आमि बांग्लाय भाषांचाही समावेश करण्यात आला आहे. यापुढे संयुक्त राष्ट्रसंघातील सर्व कामकाड आणि आवश्यक संदेश या भाषांमधूनही देण्यात येणार आहेत. भारताने या निर्णयाचे स्वागत केले आहे. याच्या व्यरितिक्त अरबी, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ६ कार्यालयीन भाषा आहेत, ज्यात इंग्रजी आणि फ्रेंच या प्रामुख्याने आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी असलेले राजदूत टीएस तिरुमूर्ती यांनी सांगितले की, यावर्षी पहिल्यांदा प्रस्तावात हिंदी भाषेचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात उर्दू आणि बांग्ला भाषांचाही उल्लेख आहे. या बदलाचे आम्ही स्वागत करीत आहोत. भारत २०१८ सालापासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या वैश्विक संचार विभागासोबत सहकार्य करीत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बातम्या आणि मल्टीमीडिया कंटेन्ट हिंदी भाषेत प्रसारित करण्यासाठी निधीही देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
UN General Assembly adopts resolution on multilingualism; mentions Hindi, Urdu, Bangla. Indian envoy to UN @IndiaUNNewYork @ambtstirumurti says,”India has been partnering with UN..by providing extra budgetary contribution to mainstream content in Hindi”pic.twitter.com/JGMUiWWQbF
— Sidhant Sibal (@sidhant) June 10, 2022
हिंदीचा प्रसार व्हावा यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. यासाठी २०१८ साली हिंदी @Unयोजनेची सुरुवात करण्यात आली. यामध्ये हिंदी भाषेतून संयुक्त राष्ट्रसंघाचा परिघ वाढवणे आणि जगातील हिंदी भाषिकांना संयुक्त राष्ट्रसंघाची अधिकाधिक माहिती देणे हा होता.
तिरुमूर्ती यांनी १ फेब्रुवारी १९४६ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या सत्रात स्वीकारण्यात आलेल्या प्रस्तावाचा उल्लेख केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या उद्दीष्टांची माहिती जगातील सर्व नागरिकांना झाल्यासच, संयुक्त राष्ट्राचा उद्देश साध्य होईल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. बहुभाषिकवाद हा संयुक्त राष्ट्रसंघात योग्य प्रकारे स्वाकीरण्य़ात यावा आणि तो मिळवण्यासाठी संयुक्त राष्ट्राला भारत नेहमी पाठिंबा देईल असेही तिरूमूर्ती यांनी सांगितले आहे.