गोपालगंज : आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न (Marriage) करण्यास नकार दिल्याने वडिलांनी आपल्या भावासह मिळून गळा दाबून मुलीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना बिहारमधील गोपालगंज येथे घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी मुलीचा मृतदेह घराजवळील शेतात टाकून दिला. याप्रकरणी पीडितेच्या आईच्या जबाबानुसार मुलीचे वडिल आणि दोन काका यांच्याविरुद्ध नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. (Daughter murdered by father in Bihar for refusing to marry his favorite boy)
पीडित मुलीचे कुटुंब नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोतवा गावातील रहिवासी आहेत. मुलीच्या वडिलांना मसांथाना गावातील बिरछा येथील तरुणासोबत तिचे लग्न लावायचे होते. मात्र मुलीला आणि तिच्या आईला तो मुलगा पसंत नव्हता. तसेच मुलीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध होते आणि तिला त्याच्यासोबत लग्न करायचे होते. याच वादातून मुलीच्या वडिलांनी मुलीची हत्या केली. मुलीचे वडिल नेहमी दारु प्यायचे. रविवारी रात्रीही मुलीचे वडिल आणि तिचे दोन काका दारुच्या नशेत घरी आले आणि त्यांनी मुलीचा गळा चिरला. यावेळी मध्ये पडलेली मुलीची आईही जखमी झाली आहे.
सोमवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच नगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला. तीनही आरोपी घरातून फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. शहर निरीक्षक लालन कुमार यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांच्या संशोधनात सर्व काही स्पष्ट झाले असून गुन्हेगारही लवकरच पकडले जातील. तसेच आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी सुरु असल्याचे एसडीपीओ संजीव कुमार यांनी सांगितले.
बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव-खामगाव रोडवरील कनारखेड फाट्यावर 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थतेत आढळला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, ही घटना आत्महत्या आहे की हत्या ?, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. याप्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार मयत गणेश वाकोडे याने शर्टाच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिस पुढील तपास करत आहेत. तर मृतक गणेश वाकोडे याने खरंच आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, याचाही तपास पोलीस करत आहेत. (Daughter murdered by father in Bihar for refusing to marry his favorite boy)
इतर बातम्या
Amaravati Crime : हरवलेले आणि चोरी गेलेले 22 लाख किंमतीचे 150 मोबाईल अमरावती शहर पोलिसांनी केले परत