राम नगरी अयोध्येत आज दीपोत्सव 2021 च्या मार्फत एका नव्या विक्रमाची नोंद होणार आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य दीपोत्सव कार्यक्रमा सुरूवात झाली आहे. आज अयोध्येत 12 लाख दिव्यांची रोषणाई करण्यात येईल. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीम त्यांची मोजणी करेल. 12 लाख दिव्यांपैकी 9 लाख दिवे रामाच्या चरणी आणि उर्वरित अयोध्येत 3 लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Deepotsav 2021 begins in Ayodhya UP with 12 lakh diyas world record)
आस्था के दिव्य प्रकाश से जगमग अयोध्या…#Deepotsav2021 #Ayodhya@NeelkanthAd @UPGovt @MinOfCultureGoI pic.twitter.com/agSz9c0KeF
— UP Tourism (@uptourismgov) November 2, 2021
अयोध्येत रामाच्या चरणी सुमारे 9 लाख दिवे प्रज्वलित केले जातील, रामजन्मभूमी संकुलात 51,000 दिवे, अयोध्येतील प्राचीन मंदिरे आणि इतर ठिकाणी 3 लाखांहून अधिक दिवे लावले जातील. याशिवाय अयोध्येतील जवळपास सर्व पौराणिक ठिकाणे, तलाव, मंदिरे येथे दिवे लावले जातील. अयोध्येशिवाय बस्ती जिल्ह्यातील माखोडा येथे अनेक ठिकाणी दिवे लावले जाणार आहेत. मखौडा धाम हे तेच ठिकाण आहे जिथे महाराज दशरथांनी पुत्रश्रेष्ठ यज्ञ केला होता. त्यानंतर राजा दशरथाच्या घरी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा जन्म झाला.
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची स्थापना झाल्यानंतर 2017 मध्ये अयोध्यामध्ये दीपोत्सव कार्यक्रम सुरू झाला. प्रथम सुमारे 1,80,000 दिवे प्रज्वलित करण्यात आले. त्याचप्रमाणे 2018 मध्ये 3,01,152, नंतर 2019 मध्ये 5,50,000 आणि 2020 मध्ये 5,51000. आता 2021 हे योगी सरकारच्या कार्यकाळाचे शेवटचे वर्ष आहे.
प्रदेशवासियों को दीपावली की हार्दिक बधाई। मेरी सभी जनप्रतिनिधियों से अपील हैं कि वे सब एक-एक घर को अपनाएं और उन घरों में दीप जलाने और मिठाई प्रदान करने में अपना योगदान दें, उन परिवारों के बच्चों को भी दीपावली का उपहार दें: उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, लखनऊ pic.twitter.com/oGwgLv5fH8
— ANI_HindiNews (@AHindinews) November 3, 2021
यावेळी दीपोत्सवात 45 स्वयंसेवक, 15 महाविद्यालयांचे विद्यार्थी, 5 महाविद्यालये, राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठाच्या 35 विविध विद्याशाखा स्वयंसेवक म्हणून योगदान देत आहेत. त्यांची एकूण संख्या सुमारे 12 हजार आहे. हे सर्व दिवे लावण्यासाठी 36,000 लिटर मोहरीचे तेल वापरण्यात येईल. या लोकांना 32 टीम्समध्ये विभागण्यात आले आहे.
Other News
Deepotsav 2021 begins in Ayodhya UP with 12 lakh diyas world record