अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज उत्तर गुजरातमध्ये आले होते. त्यांनी दीसा (deesa airbase) येथे भारत-पाकिस्तान सीमेजवळ नव्या सैन्य हवाई तळाचा शिलान्यास केला. इंडियन एअर फोर्सचा (IAF) हा नवीन बेस भारत-पाकिस्तान सीमेपासून अवघ्या 130 किमी अंतरावर आहे. पाकिस्तानला लागून असणाऱ्या सीमेपासून हा बेस जवळ आहे. त्यामुळे एअर फोर्ससाठी हा तळ महत्त्वाचा असणार आहे.
काही मिनिटात पाकिस्तावर घातक वार करणं शक्य
या एअरबेसमुळे भारताच्या सैन्य ताकतीमध्ये वाढ होणार आहे. पाकिस्तान आपला कट्टर शत्रू आहे. भारताला अडचणीत आणण्याची एकही संधी पाकिस्तान सोडत नाही. अशा परिस्थितीत कधी युद्धाची स्थिती निर्माण झाली, तर हा एअरबेस महत्त्वाची भूमिका अदा करेल. या एअरबेसमुळे इंडियन एअर फोर्सला काही मिनिटात पाकिस्तावर घातक वार करणं शक्य आहे.
मोदी सरकारने 2020 मध्येच घेतला निर्णय
दीसा एअरबेसच्या उभारणीचा निर्णय मोदी सरकारने 2020 मध्येच घेतला होता. या एअरबेसच्या निर्मितीसाठी 1 हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे. एक्सपर्ट्सच्या मते, युद्धकाळात या एअरबेसच महत्त्व भरपूर असेल. दीसा हा दक्षिण पश्चिम हवाई स्वॅक मुख्यालयातंर्गत नववा एअरबेस आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानचे एअरबेस स्वॅकच्या अंतर्गत येतात.
कधीपर्यंत एअरबेस बनून तयार होईल?
दक्षिण-पश्चिम एअर कमांडसाठी या एअरबेसच लोकेशन महत्त्वपूर्ण आहे. या एअरबेसमुळे महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानची हवाई सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. या एअरबेसवर बोइंग सी-17 ग्लोबमास्टरसह नव्या जनरेशनची फायटर जेट्स तैनात केली जातील. 2024 पर्यंत हा एअरपोर्ट बनून तयार होईल. 4500 एकरमध्ये हा एअरबेस पसरलेला आहे.