बंगळुरू: छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे, असं धक्कादायक विधान कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाल्यावर बोम्मई यांनी खुलासा केला आहे. आपण असं म्हणलोच नाही. माझं विधान चुकीच्या पद्धतीने दाखवलं आहे, असं सांगतानाच छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी आदर्शच, समाजकंटकांकडून दुही माजवण्याचा प्रयत्न होत आहे, असं बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मीडियाशी संवाद साधताना हे स्पष्टीकरण दिलं. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर सांगोळी रायण्णा आणि राणी चेनम्मा यांनी देशाच्या गौरवासाठी आणि रक्षणासाठी केलेलं कार्य महान आहे. दोघेही आमच्यासाठी आदर्शच आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांच्या आदर्शावरच आमची वाटचाल सुरू आहे. त्यांचा आदर राखणं हे प्रत्येकाचं काम आहे. मात्र काही समाजकंटकांकडून वाद निर्माण केला जात आहे. भाषा आणि इतर मुद्द्यांवरून हे लोक फूट पाडत आहे, असं बोम्मई म्हणाले.
Shivaji Maharaj & Sangolli Rayanna, both are freedom fighters&our idols. I respect & follow them. Some anti-social elements trying to create disturbance & trying to divide people in terms of language& other things: Karnataka CM Basavaraja Bommai on the desecration of statues pic.twitter.com/8r3Rr9YJR1
— ANI (@ANI) December 18, 2021
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली राजकारण आणून जर कोणी कायदा हातात घेत असेल तर आमचं सरकार खपवून घेणार नाही. सामंजस्यपणाने यासंदर्भात बोललं पाहिजे. कोणालाही कायदा व सुव्यवस्था भंग करण्यास यापुढे सरकार मुभा देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
शिवाजी महाराज आणि सांगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याच्या विटंबनेवरून गेल्या दोन दिवसांपासून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्या नावाने लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही. आम्ही त्यावर कठोर कारवाई करू. आम्ही बंगळुरूमध्ये तीन जणांना अटक केली आहे. 27 जणांना बेळगाववरून अटक केली आहे. अनेकांची धरपकड होणार आहे. हे सर्व समाजकंटक आहेत. मी स्पष्टपणे सांगतो, शिवाजी महाराज हे देशभक्त होते. त्यांच्याबद्दल आदरच आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या नावाने कुणालाही बखेडा निर्माण करू देणार नाही. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कुणालाही दुखावले नाही. कोणत्याही भाषिकांना दुखावलेलं नाही. ते माझ्या रक्तात नाही. हेच मला स्पष्ट करायचं आहे. सर्वांनी शिवाजी महाराज आणि सांगोळी रायण्णांचा आदर केला पाहिजे हेच आमच्या सरकारचं धोरण आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
रातोरात महाराष्ट्र एकीकरण समितीनं जे केलं, त्याचा आम्ही निषेध करतो. कुणीही कायद्याविरोधात गेलं, तर कारवाई ही होणारचं. गृहमंत्र्यांना तसे कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. छोट्या-मोठ्या घटनेसाठी सावर्जनिक मालमत्तेचं नुकसान सहन केलं जाणार नाही.
“ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನಡೆದ ಪುಂಡಾಟಿಕೆ ಖಂಡನೀಯ. ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ಧಕ್ಕೆ ತಂದರೆ ಕಠಿಣ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲು ಗೃಹಸಚಿವರಿಗೆ ಸೂಚನೆ ನೀಡಲಾಗಿದ್ದು, ಹಲವರ ಬಂಧನವೂ ಆಗಿದೆ. ಕಲ್ಲು ತೂರಾಟ, ಸಾರ್ವಜನಿಕ ಆಸ್ತಿಗೆ ಹಾನಿ ಮಾಡುವುದು ಕಾನೂನುಬಾಹಿರ. ಇಂತಹ ಘಟನೆ ನಡೆಯದಂತೆ ದೀರ್ಘಾವಧಿ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲು ಪೊಲೀಸರಿಗೆ ಸೂಚಿಸಿದ್ದೇನೆ.” (1/2)
— CM of Karnataka (@CMofKarnataka) December 18, 2021
वादाचं मूळ काय?
कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ शुक्रवारी रात्री व्हायरल (Viral Video) झाला होता. विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सुरुवात केली होती. बंगळुरुतील एक चौकातील हा पुतळा असून, त्याची गुरुवारी रात्री विटंबना करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. या घटनेचा व्हिडीओ तयार करुन तो सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर ही घटना समोर आली आणि चौफेर या घटनेबाबत तीव्र पडसाद उमटू लागले.
वाद चिघळणार?
या वादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत, छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे, अशा अर्थाचं विधान केल्यानं हा वाद आता आणखी ताणला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान कर्नाटकातील पोलिसांना या संपूर्ण घटनेप्रकरणी कायद्याचं उल्लंघन करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत. त्याचप्रमाणे गृहमंत्र्यांना या घटनेकडे लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत.
तीव्र पडसाद
बंगळुरुतील या घटनेचा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून निषेध केला जातोय. या घटनेच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी सांगली जिल्ह्यातल्या मिरजमध्ये कर्नाटकातील गाडी खासगी गाड्यंची तोडफोड केली आहे. तर तिकडे बेळगावातही शिवप्रेमींची अडवणूक करण्यात आली आहे. शिवाजी गार्डन इथं छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या शिवप्रेमींनी कर्नाटक पोलिसांनी रोखलं होतं. या तणावाच्या पार्श्वभूमीवर 144 कलम बेळगावात लागू करण्यात आलं असून मोठा पोलीस फौजफाटाही या भागात पाहायला मिळतोय.
युवराजांनी नोंदवला निषेध
बंगळुरू येथील घटनेचा युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी कडक शब्दांत निषेध नोंदवलाय. दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या ट्वीटमध्ये (Tweet) म्हटले आहे की,
संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करावी!
संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी. @PMOIndia @BSBommai
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 18, 2021
‘दोषींवर कारवाई कराच’
मंत्री छगन भुजबळ यांनीही याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली आहे. भुजबळ म्हणाले की,..
नरेंद्र मोदी हे छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आले आहेत. मात्र, त्यांच्या भाजपच्या राज्यात या नराधमांनी हे कृत्य केले. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची आमची मागणी आहे. पुतळ्याला अभिषेक करण्यासाठी गेलेल्या लोकांना अडविणे योग्य नाही. आम्ही छत्रपतींना दैवत मानतो. याप्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करावी.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा :
औरंगाबादेतून आता शेतमालाचेही उड्डाण? केंद्रीय मंत्र्यांचे सकारात्मक संकेत, काय आहे योजना?
बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठली अन् खिलार बैलांची हजारांची किंमत लाखोंवर पोहचली