नवी दिल्लीः दिल्लीतील वायू प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता (Air quality Index) पूर्वीपेक्षा खराब स्थिती आहे. शनिवारी एनसीआरमधील (Delhi NCR) सर्व प्रमुख शहरांची ‘डार्क रेड झोन’ (dark zone) मध्ये नोंद झाली. ज्यामध्ये गाझियाबाद, ग्रेटर नोएडासह इतर अनेक शहरांचा समावेश आहे. या खतरनाक प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या संसर्गाचा धोका (lungs infection) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिल्लीत मोकळ्या हवेत श्वास घेणेही धोक्याचं बनत चाललय आहे. (Delhi Air Quality Index in severe stage Medanta doctor says more people died due to air pollution than Corona)
ICS-मेदांता हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ अरविंद कुमार यांनी दिल्लीत वाढत्या वायू प्रदूषणावर चिंता व्यक्त करत म्हणाले की, लंग्स केयर फाउंडेशनच्या (Lungs Care Foundation) अभ्यासानुसार, 50 टक्क्यांहून अधिक किशोरवयीन मुलांमध्ये छातीत संसर्गाचे लक्षणे दिसतात. 29 टक्के लोकांना दमा आहे. त्याच वेळी, 40 टक्के किशोरवयीन मुलं लठ्ठ आहेत. यामुळे मुलांमध्ये दम्याचा धोका 200 टक्क्यांनी अधिक आहे. आतापर्यंत दिल्लीत कोरोनापेक्षा प्रदूषणामुळे जास्त मृत्यू झाले आहेत, असंही ते म्हणाले. डॉ अरविंद म्हणाले की, प्रदूषण रोखण्यासाठी स्मॉग टॉवर (Smog Tower) लावणे हा उपाय नाही. स्मॉग टॉवरस लावणे म्हणजे जनतेच्या पैसा वाया घालवण्यासारखे आहे.
Installing a smog tower is a colossal waste of public money, & a grave mistake. The answer lies in preventing the air from getting polluted. Pollution has killed more people than COVID has: Dr. Arvind Kumar, Chairman, Institute of Chest Surgery, Medanta, on air pollution
— ANI (@ANI) November 7, 2021
रविवारी दिल्लीच्या हवेची गुणवत्ता (Air quality Index) 436 नोंद झाली, जी ‘गंभीर’ श्रेणीत येते. तेच PM 10- 412 आणि PM 2.5 -286 आहे, (particulate matter in air causing pollution) ज्याची पण ‘गंभीर’ श्रेणीत नोंद होते. दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदी असतानाही चांगलीच आतिशबाजी झाली. फटाक्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून एनसीआरमधील वायू प्रदूषणाची स्थिती अजून गंभीर झाली आहे.
06 Nov –
AQI – 437 (401 to 500 – Severe)
PM10 – 448 (Above 430 – Severe)
PM2.5 – 318 (Above 250 – Severe) https://t.co/UqVVjYGzqE
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) November 6, 2021
Other News