नवी दिल्ली: कोरोनाचं संकटाच्या पार्श्वभूमीवर थर्टीफर्स्टला तरुणांनी एकत्र येऊन दारूच्या पार्ट्या झोडू नयेत म्हणून अनेक राज्यांनी संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, दिल्लीमध्ये दारू पिण्याचं वय 25 वरून 21 करण्यात येणार आहे. त्यामुळे वयाची एकवीशी गाठलेल्या तरुणांना बिनदिक्कतपणे ग्लासवर ग्लास रिचवण्यात येणार आहेत. (Delhi panel suggests lowering legal drinking age to 21 from 25)
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सप्टेंबरमध्ये एक समिती स्थापन केली होती. अबकारी आयुक्त या समितीचे चेअरमन होते. दारूची किंमत, दारू विक्रीच्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी राज्य उत्पादन शुल्कातील वाढीसाठीचे उपाय शोधण्याचं काम या कमिटीवर सोपवण्यात आलं होतं. त्याचा अहवाल या समितीने दिला आहे. त्यात दारू पिण्याचं वय 25 वरून 21 करण्याची शिफारस करण्यात आली आहे. बियर आणि वाईनला डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये ठेवण्याची तसेच ड्राय डेज घटवून केवळ वर्षातून केवळ तीन वेळाच ड्राय डेज ठेवण्याची शिफारसही करण्यात आली आहे. दिल्ली सरकारने या शिफारसी स्वीकारल्यास दिल्लीतील दारू बाबतचे सर्व नियमच बदलून जाणार आहेत. दरम्यान, समितीच्या या शिफारशींवर दिल्ली सरकारकडून जनतेकडून सल्ला घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
समितीच्या शिफारशी
>> बियर आणि वाईनला विक्रीसाठी डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये ठेवा
>> वर्षातून केवळ तीनच ड्रायडेज असावेत
>> सर्व 272 पालिका वॉर्डात 3-3 दारूची दुकाने असावीत. म्हणजे 272 वॉर्डात 816 दारूची दुकाने असावीत
>> एनडीएमसीमध्ये एकूण 24 रिटेल वेंड्स (दुकाने) असावीत
>> इंदिरा गांधी विमानतळावर एकूण 6 रिटेल वेंड्स असावेत
>> उत्तर प्रदेश आणि हरयाणाप्रमाणे दिल्लीतही दारू पिण्याचं वय 25 वरून 21 करावं
>> सध्या दिल्लीत दारूची 864 दुकाने आहेत. परंतु एका विभागात अनेक दुकाने आहेत, तर दुसऱ्या विभागात अनेक दुकाने आहेत (Delhi panel suggests lowering legal drinking age to 21 from 25)
VIDEO | SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 30 December 2020 https://t.co/xSWOe9xDc6 @CMOMaharashtra #superfastnews #TopNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 30, 2020
संबंधित बातम्या:
LIVE | सप्तशृंगी देवीचे मंदिर 31 डिसेंबरपासून 24 तास खुले, भाविकांच्या गर्दीमुळे निर्णय
न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी आमीर खानचा मुक्काम सिंधुदुर्गातील भोगवे बीचवर
New COVID Strain | कोरोनाच्या नव्या अवताराची डोकेदुखी, यूकेत पहिल्यांदाच एका दिवसात 40 हजार रुग्ण
(Delhi panel suggests lowering legal drinking age to 21 from 25)