नवी दिल्ली : इंडिगो एअर लाईनच्या विमानात दोन प्रवाशांनी एका एअर होस्टेसची छेड काढली. त्यानंतर विमानाच्या कॅप्टनला मारहाण केली. हा प्रताप करणाऱ्या तिघे जण राजकीय व्यक्तींशी संबंधित आहे. दिल्लीवरुन पटनाकडे जाणाऱ्या विमानात ही घटना घडली.
इंडिगो एअर लाईनच्या विमानात तिघे जण दारु प्राशन करुन चढले. फ्लाइटच्या आत या तरुणांनी प्रवाशांशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. एअर होस्टेस आणि कॅप्टनने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना मारहाण केली.एअर होस्टेसशी छेड काढली. वैमानिकाने याबाबत पटणा विमानतळ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
आरोपींची नावे
एकाचे नाव रोहित कुमार, दुसऱ्याचे नाव नितीन कुमार आणि तिसऱ्याचे नाव पिंटू कुमार आहे. तिघेही बिहारचे रहिवासी आहेत. तिघांनीही भरपूर दारू प्राशन केली होती. यापैकी पिंटू फरार झाला आहे. इतर दोघांना अटक केली आहे. आरोपींची ब्रेथ एनालाइजर टेस्ट केली गेली. त्यात त्यांना मद्य प्राशन केल्याचे स्पष्ट झाले.
तिघे राजकीय पदाधिकारी असल्याचा दावा
आरोपींनी आपण राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. त्यातील एक जण एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची खास व्यक्ती असल्याचा दावा करतोय. रात्री उशिराच फ्लाइटच्या कॅप्टनने याप्रकरणी लेखी तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी रोहित आणि नितीनला अटक करून पोलीस ठाण्यात नेले.