राहुल गांधी यांच्या नावावर चक्क स्वत:चं चार मजली घर केलं, ती महिला कोण?; का होतेय चर्चा?

| Updated on: Apr 02, 2023 | 12:05 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांना घर खाली करण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी बेघर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील एका महिलेने आपले घरच राहुल गांधी यांच्या नावे केले आहे.

राहुल गांधी यांच्या नावावर चक्क स्वत:चं चार मजली घर केलं, ती महिला कोण?; का होतेय चर्चा?
Rahul Gandhi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एका प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा झाली. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली. त्यापाठोपाठ त्यांना सरकारी बंगला खाली करण्याची नोटीसही बजावण्यात आली. त्यासाठी त्यांना 30 दिवसांचा अवधीही देण्यात आला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यांना बेघर करण्यात आलं. त्यामुळे काँग्रेसमध्ये संताप निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने माझं घर… तुमचं घर… ही मोहीम हाती घेतली आहे. काँग्रेसची ही मोहीम सुरू असतानाच एका महिलेने चक्क राहुल गांधी यांच्या नाववर आपलं घर केलं आहे. त्यामुळे या घराची आणि महिलेची जोरदार चर्चा सुरू आहे.

राजकुमारी गुप्ता असं या महिलेचं नाव आहे. ती दिल्लीतील मंगोलपुरी येथे राहतील. येथील राहतं घर तिने राहुल गांधी यांच्या नावावर केलं आहे. राजकुमारी गुप्ता यांचं मंगोलपुरीत चार मजली अलिशान घर आहे. या महिलेने राहुल गांधी यांच्या नावावर घर खरेदी केल्याचे कागदपत्रंही शेअर केले आहेत. त्यावर या महिलेचा आणि राहुल गांधी यांचा फोटो दिसत आहे. तसेच कागदपत्रावर नोटरीची शिक्काही दिसत आहे. त्यामुळे ही महिला चर्चेत आली आहे.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर मोहीम

काँग्रेस नेते आणि काँग्रेसच्या समर्थकांनी सोशल मीडियावर मेरा घर, आपका घर कँम्पेन सुरू केलं आहे. त्यानुसार राहुल गांधी यांचे समर्थक सोशल मीडियावर आपल्या घराचा फोटो टाकत आहेत आणि त्यावर माझ घर… तुमचं घर… असा मजकूर लिहीत आहेत. काँग्रेसच्या या मोहिमेला सोशल मीडियात मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या महिलेने केवळ सोशल मीडियावर घराचा फोटो न टाकता खरोखरच आपलं घर राहुल गांधी यांच्या नावावर केलं आहे.

दोन वर्षाची शिक्षा

23 मार्च रोजी सूरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले होते. त्यानंतर त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. राहुल गांधी यांनी 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलारमध्ये एक सभा घेतली होती. त्यात त्यांनी सर्वच चोरांची नावे मोदी का असतात असा सवाल केला होता. कोर्टाने या प्रकरणात शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच राहुल गांधी यांची लोकसभा सचिवालयाने खासदारकी रद्द केली होती.

त्यानंतर दोन दिवसाने संसदेच्या आवास समितीने राहुल गांधी यांना नोटीस पाठवून बंगला खाली करण्याचे निर्देश दिले होते. 22 एप्रिलपर्यंत बंगला खाली करण्याचे आदेश राहुल गांधी यांना देण्यात आले होते. राहुल गांधी हे दिल्लीच्या लुटियन्स झोनमधील 12, तुघलक रोडवरील सरकारी बंगल्यात राहतात. 2005 पासून त्यांना हा बंगला देण्यात आलेला आहे.