नवी दिल्ली: कुतुब मिनारचं नाव विष्णू स्तंभ ठेवण्याच्या मागणीसाठी आज हिंदू संघटनांनी दिल्लीत जोरदार निदर्शने केली. कुतुब मिनार परिसरातच ही निदर्शने करण्यात आली. यावेळी हिंदू संघटनांनी हनुमान हनुमान चालिसाचं पठणही केलं. यूनायटेड हिंदू फ्रंटने कुतुब मिनारचं नाव विष्णू स्तंभ ठेवण्याची मागणी केली आहे. कुतुब मिनार (QUTUB MINAR) हे वास्तवात विष्णू स्तंभ (VISHNU PILLAR) आहे. 27 जैन आणि हिंदू मंदिरांना (hindu) पाडून या मिनारची निर्मिती करण्यात आली होती, असा दावा या संघटनेने केली आहे. यूनायटेड हिंदू फ्रंटचे कार्यकारी अध्यक्ष जयभगवान गोयल यांनी या आंदोलनाची हाक दिली होती. त्यांनी इतर हिंदू संघटनांनाही या आंदोलनात सामिल होऊन हनुमान चालिसाचा जप करण्याचे आवाहन केलं होतं. आम्हाला मशिदीत प्रार्थना करण्याची परवानगी द्या. अथाव मशिदीतून मूर्तांनी हटवा, अशी मागणीही गोयल यांनी केली.
आज दुपारी हिंदू संघटनांनी कुतुब मिनार परिसरात हे जोरदार आंदोलन केलं. जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करणाऱ्या या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कुतुब मिनारमध्ये गणपतीच्या दोन मूर्त्या उलट्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यावर हिंदु संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा पद्धतीने ठेवलेल्या मूर्त्या पाहून आमच्या भावना दुखावत आहेत. या मूर्त्या तात्काळ हटवल्या गेल्या पाहिजेत. मशिदीच्या ढाच्यावर लावण्यात आलेल्या सर्व मूर्त्या हटवण्यात याव्यात आणि त्यांची पुर्नप्रतिष्ठापना करण्यात यावी. तसेच या मूर्त्यांची पूजा करणअयाची परवानगीही देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
#WATCH दिल्ली: कुतुब मीनार के पास हिंदू संगठन महाकाल मानव सेवा के सदस्यों ने विरोध किया और कुतुब मीनार का नाम बदलकर विष्णु स्तंभ करने की मांग की। pic.twitter.com/8hClQHeWBe
— ANI_HindiNews (@AHindinews) May 10, 2022
हिंदू संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुतुब मिनार परिसरात प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्याच महिन्यात विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बंसल यांनीही कुतुब मिनार हा असली विष्णू स्तंभ असल्याचं म्हटलं होतं. कुतुब मिनार हा वास्तवात विष्णू स्तंभ आहे. कुतुब मिनारची निर्मिती 27 हिंदू-जैन मंदिरांना तोडून करण्यात आली आहे. सुपरइम्पोज्ड संरचना केवळ हिंदू समुदायाला डिवचण्यासाठी करण्यात आली होती, असं बंसल म्हणाले होते.
सरकारने कुतुब मिनार परिसरात प्राचीन मंदिरांची निर्मिती करावी. या ठिकाणी हिंदू रितीरिवाज आणि प्रार्थना पुन्हा सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विहिंपने शनिवारी केली होती. बंसल यांच्यासहीत विहिपच्या नेत्यांनी या स्मारक परिसराचा दौरा केला होता. 1993 युनेस्कोने कुतुब मिनारची नोंद जागतिक वारसा यादीत केली आहे.