अहमदाबाद : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजाराच्या नोटांबद्दल शुक्रवारी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. बँकेने या नोटा चलनातून माघारी घेण्याचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँक आता 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा चलनातून परत घेणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून 30 सप्टेंबपर्यंत दोन हजाराच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेकडून यापूर्वीच 2 हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती. पण त्या चलनात कायम होत्या. आता या नोटबंदीचा फायदा गुजरातमध्ये सराफी व्यापारी घेत आहे.
कसा घेता आहे फायदा
RBI ने 2000 नोट चलनातून बाहेर घेतल्याचा निर्णय जाहीर करताच गुजरातमधील ज्वेलर्सने 2000 रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून सोने घेणाऱ्यांसाठी किंमत वाढवून दिली आहे. दोन हजारांच्या नोट देऊन सोने घेणाऱ्यांना 10 ग्रॅमसाठी 70 हजार रुपये द्यावे लागणार आहे. राज्यात शनिवार सोन्याचा दर मात्र दहा ग्रॅमसाठी 60 हजार 275 रुपये होता. तसेच चांदीचे दरसुद्धा 80 हजार रुपये किलो करण्यात आले आहे.
सोन्याची खरेदी का?
IIFL सिक्योरिटीजचे व्हॉईस प्रेसिडेंट अनुज गुप्ता म्हणतात, ज्यांच्याकडे 2 हजार रुपयांचे जास्त नोट आहे, ते बँकेत जमा करण्यासाठी गेल्यावर त्यांची वार्षिक कमाई विचारली जाईल. त्यानुसार त्यांना कर द्यावा लागणार आहे. जास्त कॅश ठेवल्यानंतर सरकार विचारणाही करण्याची शक्यता आहे. यामुळे सोने खरेदी केली जात आहे. सोने ठेवणे आणि विक्री करणे सोपे आहे. 2016 मध्ये नोटबंदीनंतरही सोन्याचे दर वाढले होते. त्यावेळी सोने 30 हजारावरुन 50 हजारावर विक्री केली जात होता.
सोन्याचे दर वाढणार
2 हजाराची नोट चलनातून बाद केल्यानंतर लोक सोने खरेदी करत आहे. त्यामुळे सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत सोने 65 हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.
किती नोटा चलनात
31 मार्च 2018 मध्ये 6.73 लाख कोटींची नोटा चलनात होत्या. 30 एप्रिल 2023 पर्यंत फक्त 3.62 लाख कोटी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आहेत. ही रक्कम चलनी नोटांच्या 10.8 टक्के इतकी आहे. मार्च 2017 मध्ये जारी करण्यात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेने सात वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. आरबीआयच्या मते, 23 मे 2023 पासून जास्तीत जास्त 20 हजार रुपयांपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येतील. बँकेच्या इतर कामांवर परिणाम होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा
जुन्या कोट्यवधींच्या नोटा पडून, साईभक्तानों…आता दोन हजारच्या नोटा दानपेटीत टाकू नका