देसी इंजिनिअरने शेणापासून तयार केला पेंट आणि पुट्टी, पाहा काय आहेत त्याचे फायदे

| Updated on: Jun 07, 2023 | 6:29 PM

सोशल मीडियावर सध्या एका निवृत्त इंजिनियरची चर्चा आहे. कारण या व्यक्तीने शेणाचा असा वापर केलाय. ज्यामुळे त्याची मागणी वाढत आहे.

देसी इंजिनिअरने शेणापासून तयार केला पेंट आणि पुट्टी, पाहा काय आहेत त्याचे फायदे
Follow us on

मुंबई : आपल्या देशात गायला आपण आईचं स्थान दिलं आहे. कारण गाईचे मानवाला अनेक फायदे आहेत. गाईच्या शेणापासून आधी घरे सारवली जायची. शेणाने घर सारवल्याने अनेक फायदे होतात. पण शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्याने आता हे मागे पडत चालले आहे. पण ग्रामीण भागात अजूनही काही ठिकाणी शेणाचा अजूनही वापर होतो. पण आता एका व्यक्तीने गायच्या शेणापासून पेंट आणि पुट्टी बनवली आहे. एका सेवानिवृत्त इंजिनियर व्यक्तीने या प्रयोग केला आहे. इतकंच नाही तर गावातील अनेक लोकांनी आपल्या घरात शेणापासून बनलेल्या पेंट आणि पुट्टीचा वापर केला आहे.

शेणाला अजूनही मोठं महत्त्व आहे. शेणामुळे घराचं तापमान कमी होतं. झारखंडमधील सेवानिवृत मुख्य अभियंता रासबिहारी सिंह यांनी शेणापासून पुट्टी तयार केली आहे. त्यांनी तर आपल्या घरात याचा वारर केलाच. पण गावातील इतर लोकांनी देखील आपल्या घरात याचा वापर केलाय.

सेवानिवृत्त इंजीनियर रासबिहारी सिंह सध्या छोट्या प्रमाणात हे काम करत आहेत. पण याची वाढती मागणी पाहता ते लवकरच नवीन मशीन खरेदी करणार आहेत. ज्याची किंमत १५ लाख रुपये असल्याचं त्यांनी म्हटलंय.

एक किलो शेणापासून २ किलो पेंट तयार होतो. याची मार्केटिंग करण्यासाठी देखील ते आता प्रयत्न करत आहेत. शेणापासून घराचं तापमान कमी होतं असल्याचा दावा ते करतात. शेणाने भिंती साारवल्याने यामुळे घराचं तापमाण ५ अंशाने कमी होतं. बाजारात मिळणारे पेंट आणि पुट्टीचा खर्च हा शेणाच्या खर्चापेक्षा तीन पट अधिक आहे.

बाजारात पेंट हा 1200 रुपए प्रति लीटरने मिळतो. पण शेणापासून तयार केलेल्या पेंट हा तीनशे ते चारशे रुपये प्रति लीटरमध्ये मिळत आहे. यामध्ये केमिकलचा वापर देखील खूप कमी प्रमाणात केला जातो.

रासबिहारी यांनी सांगितले की, त्याने शेणापासून मोठ्या प्रमाणात पेंट तयार करण्यासाठी मशीन देखील मागवली आहे. यामुळे मागणीनुसार त्यांना ती लोकांपर्यंत पोहोचवता येईल.

रास बिहारी सिंह यांनी सांगितले की, यामुळे गायीचं संवर्धन देखील वाढेल. एक किलो शेणापासून दोन ते अडीच लीटर पेंट बनवता येतो. गायीच्या शेणाच एक विशेष प्रकारचे केमिकल असते. त्यामुळेच ते फक्त गायचं शेणचं वापरतात.