देशभरातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीची यादी, सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण? या मुख्यमंत्र्यांकडे केवळ 15 लाखांची संपत्ती

| Updated on: Dec 31, 2024 | 2:59 PM

India Richest CM List: ममता बनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. त्यापूर्वी त्या केंद्रीय मंत्री आणि खासदारीही राहिल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून त्यांना महिन्याला 50 हजार रुपये पेन्शन मिळते. परंतु हे पेन्शन किंवा मुख्यमंत्रीपदाचा पगार ममता बॅनर्जी घेत नाहीत.

देशभरातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीची यादी, सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण? या मुख्यमंत्र्यांकडे केवळ 15 लाखांची संपत्ती
India Richest CM List
Follow us on

India Richest CM List: देशभरातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीची यादी आली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म (एडीआर) ने देशभरातील मुख्यमंत्र्यांची संपत्तीचा अहवाल दिला आहे. या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही समावेश आहे. या अहवालानुसार योगी आदित्यनाथ यांच्याकडे केवळ 1.54 कोटींची संपत्ती आहे. परंतु त्यांच्या शेजारच्या राज्यातील मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याकडे त्यांच्यापेक्षा चार पट जास्त संपत्ती आहे. पुष्कर सिंह धामी यांच्याकडे 4.64 कोटींची संपत्ती आहे.

सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू

एडीआरच्या यादीनुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे 931 कोटी रुपयांची संपत्ती आहे. दुसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पपेमा खांडू आहेत. त्यांच्याकडे 332 कोटींची संपत्ती आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया तिसऱ्या क्रमांकावर आहे. सिद्धारमैया यांच्याकडे 51 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 13.27 कोटी

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे 25.33 कोटींची संपत्ती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा कोटीपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यांच्याकडे 13.27 कोटी रुपये संपत्ती असल्याचे एडीआरच्या अहवालात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

सर्वात कमी संपत्ती ममता बॅनर्जीकडे

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्याकडे 7.81 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे 1.97 कोटी रुपये संपत्तीचे मालक आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याजवळ 1.64 कोटी रुपये आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याकडे 1.41 कोटींची संपत्ती आहे. 13 वर्षांपासून बंगालच्या मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांच्याकडे केवळ 15 लाखांची संपत्ती आहे. 2021 मधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी 16.72 लाख रुपये संपत्ती असल्याचा खुलासा केला होता. यामुळे त्यांची संपत्ती आता कमी झाल्याचे दिसत आहे.

ममता बनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. त्यापूर्वी त्या केंद्रीय मंत्री आणि खासदारीही राहिल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून त्यांना महिन्याला 50 हजार रुपये पेन्शन मिळते. परंतु हे पेन्शन किंवा मुख्यमंत्रीपदाचा पगार ममता बॅनर्जी घेत नाहीत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना 2 लाख 10 हजार रुपये पगार देण्याची तरतूद आहे.