नवी दिल्ली – राज्यात सुरु असलेल्या राजकीय कारस्थानाचे सूत्रधार हे देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadanvis) आहेत, असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांनी केला आहे. फडणवीस दर दोन दिवसांआड दिल्लीत येतात, अमित शाहा (Amit Shah)आणि जे पी नड्डा यांची भेट घेतात. इथे पुढची रणनीती आखतात. ईडीचं कायरायचं, ईडीच्या याद्या देतात. कुणावर काय कारवाी करायची, कुणावर कसा दबाव टाकायचा, हे ठरवतात. मग साधनसामुग्रीची व्यवस्था करतात. दर दोन दिवसांनी ते हे करतात, त्यामुळे तेच याचे सूत्रधार आहेत, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. याच मालिकेत आज बैठका झाल्या असतील, उद्या परवा पुन्हा बैठका होतील, असेही चव्हाण म्हणालेत.
फडणवीस प्रयत्न करीत असले तरीही सरकारला काहीही होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. ११ तारखेला तेव्हा सुनावणी घेऊ तेव्हा आहे तशीच परिस्थिती ठेवा, असे कोर्टाने सांगितले असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मात्र त्याही स्थितीत जर कुणी मुख्यमंत्र्यांना विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगितला, तरी शिवसेनेत विधिवत फूट पडलेली नाही, अशा स्थितीत शिवसेनेचा व्हीप त्यांना लागू असेल, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले
अशा विश्वासदर्शक ठरावावेळी विधानसभा अध्यक्षपद कोण स्वीकारणार, हाही प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव असताना त्यांना अध्यक्षपद घेता येईल का, हाही मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले. अशा स्थितीत प्रोटेम स्पीकरची विनंती मुख्यमंत्री करणार का, याबाबत राज्यपालांना स्वताचे अधिकार नसतात असेही चव्हाण म्हणाले. त्यामुळे हे सोपे नसल्याचे त्यांनी सांगितले. जरी सर्वसंमतीने अध्यक्षपद कुणीतरी स्वीकारले, तरी शिवसेनेत वैधानिक फूट पडलेली नाही. त्यामुळे शिवसेनेचा व्हीप त्यांना लागू आहे. तो बंडखोरांनी पाळला नाही, तर त्यांचे सदस्यत्व रद्द होईल. हा गुंता सोडवावाच लागेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहावेत किंवा सर्वसहमतीने मार्ग निघायला हवा, असेही चव्हाण यांनी सांगितलेले आहे.
राष्ट्रपती राजवट लावण्याबाबतही त्यांनी आपली भूमिका मांडली. सुप्रीम कोर्टाने जर जैसे थे परिस्थिती सांगितली असेल, तर असा निर्णय घेता येणार नाही. पण जरी तो निर्णय केंद्राने घेतला तर आम्ही त्याविरोधात कोर्टात जाऊ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमध्ये पडलेली फूट हा चिंतेचा विषय आहे. याबाबत काँग्रेस प्रभारींना सांगितले आहे की याची चौकशी केली पाहिजे. योग्य वेळी कारवाई केली नाही तर पुन्हा असे घडण्याची शक्यता आहे. चंद्रकांत हंडोरेंना २९ मते दिली होती, त्यांना २२ मते पडली. सात मते फुटली, त्याची चौकशी होणे गरेजेचे आहे असेही चव्हाण यांनी सांगितले आहे.