नवी दिल्ली – आयुष्मान भारत डिजिटल आरोग्य मिशन अंतर्गत देशातील सर्व वैद्यकीय सुविधा आणि डॉक्टरांचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गंत देशभरातील डॉक्टर आणि उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधा यांची माहिती आता एका क्लीकवर उपलब्ध होणार आहे. या संदर्भात देशातील सर्व सरकारी रुग्णालये आणि संबंधित सरकारी विभागाला पत्र लिहिण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.
डिजिटायझेशन प्रक्रियेला 27 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते. या अंतर्गत केंद्र सरकारकडून एबीडीएचएम (ABDHM) नावाचे वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या वेबपोर्टलवर जाऊन आपल्या रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या आरोग्य सुविधांची नोंद करण्याचे आवाहन खासगी क्षेत्रातील डॉक्टरांना करण्यात आले आहे.
दरम्यान केंद्र सरकारचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. मात्र तो किती यशस्वी होईल, खासगी क्षेत्रातील डॉक्टर त्याला प्रतिसाद देतील का? असा सवाल तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. आम्हाला यामध्ये येणाऱ्या अडचणींची पूर्ण कल्पना आहे. येणाऱ्या अडचणी दूर करून, खासगी क्षेत्रातील वैद्यकीय सेवांची कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर आम्ही भर देत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
सावरकर धार्मिक नेते नव्हते; हिंदुत्वाचा हिंदू धर्माशी संबंध नाही, दिग्विजय सिंग यांचा भाजपावर निशाणा
Jammu Kashmir: पुन्हा दहशतवादी हल्ला, एक नागरिक आणि पोलिस जखमी