अयोध्या | 15 जानेवारी 2024 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केले. या अॅपमुळे भाविकांना अयोध्या भेट सुलभ होणार आहे. अयोध्येतील प्रमुख ठिकाणांची माहिती, नकाशा, वाहतूक, राहण्याची व्यवस्था यासह अनेक प्रकारच्या सुविधा या अॅपमध्ये देण्यात आल्या आहेत. हे अॅप अयोध्येत येणाऱ्या भाविकांना समर्पित आहे असे मुख्यमंत्री योगी सरकार यांनी म्हटले. हे अॅप अयोध्या विकास प्राधिकरणाने अयोध्येत येणाऱ्या भाविकांना समर्पित केले आहे. योगी सरकार अयोध्येला जागतिक पर्यटन शहर म्हणून प्रस्थापित करत आहे. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या पाहता सर्व प्रकारच्या सुविधांनी युक्त असे हे अॅप एक व्यासपीठ म्हणून विकसित करण्यात आले आहे.
मोबाईल अॅप अयोध्यामध्ये शहरात पर्यटक आणि अभ्यागतांना त्यांच्या आगमनापासून ते त्यांच्या मुक्कामापर्यंतच्या सर्व गरजा पुरवेल अशी माहिती देण्यात आली आहे. मुक्कामासाठी होम स्टे, पर्यटनासाठी प्रदूषणमुक्त इलेक्ट्रॉनिक कार, शहर, विकास, कंपनीने प्रदान केलेल्या ५० इलेक्ट्रॉनिक बसेस, गोल्फ कार्ट्स, हॉप ऑन हॉप ऑफ व्हेइकल्स, व्हील चेअर्स, स्थानिक मान्यताप्राप्त आणि प्रशिक्षित पर्यटक मार्गदर्शक इत्यादींच्या ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी मार्गाची स्थिती अशी सर्व माहिती यामुळे भाविकांना मिळणार आहे.
अयोध्या शहर, आसपासच्या परिसरातील विविध मंदिरे, मठ, ऐतिहासिक ठिकाणे, धार्मिक स्थळ ते नेव्हिगेशनद्वारे मार्गदर्शन, स्थानिक खाद्यपदार्थ अशा सर्व प्रकारची माहिती यामध्ये उपलब्ध होणार आहे. यशिवाय जवळच्या पार्किंग सुविधेसह, पार्क केलेल्या वाहनांच्या स्थिती, ऑनलाइन बुकिंग देखील या अॅपद्वारे करता येणार आहेत.
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राणअभिषेक केला जाणार आहे. या भव्य सोहळ्याला देशभरातून 7000 हून अधिक विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत. अयोध्या राम मंदिराच्या उभारणीसाठी सुमारे 900 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. दारे आणि खिडक्यांचे लाकूड महाराष्ट्रातील बल्लारपूर येथून आणले आहे. तर दरवाजे आणि खिडक्यांवर कोरीव काम हैदराबादच्या कामगारांनी केले आहे.
श्री रामजन्मभूमी क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम तीन तासांपेक्षा जास्त काळ चालणार असल्याचे म्हटले आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाबाबत ट्रस्टने काढलेली ब्ल्यू प्रिंट तीन तासांपेक्षा जास्त कालावधीचा कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहे. अडचणी टाळण्यासाठी संत मुनींनी वेळेपूर्वी पोहोचावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था मर्यादित आहे. तर, रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आरएसएस प्रमुख मोहन भागवत, राज्यपाल आनंदी बेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि श्री रामजन्मभूमी क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास या चार व्यक्ती उपस्थित असतील अशी माहिती ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली.