दिवाळी बोनसमध्ये या कंपनीने दिली कर्मचाऱ्यांना मर्सिडिस बेन्झ, हुंडई गाडी… लग्नासाठी लाखमोलाची मदत

| Updated on: Oct 14, 2024 | 3:03 PM

diwali bonus 2024: कार अन् बाईक सोबत कर्मचाऱ्यांना लग्नासाठीही मदत देत असतो. यापूर्वी कंपनी ५० हजार रुपये देत होती. आता ही रक्कम १ लाख करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या घरातील आनंदात सहभागी होण्याची संधी आम्हाला मिळते. तसेच आमच्या कर्मचाऱ्यांचे मनौधर्य वाढते. त्याचा परिणाम उत्पादन वाढीवर होतो.

दिवाळी बोनसमध्ये या कंपनीने दिली कर्मचाऱ्यांना मर्सिडिस बेन्झ, हुंडई गाडी... लग्नासाठी लाखमोलाची मदत
कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसमध्ये कार गिफ्ट दिल्या
Follow us on

diwali bonus 2024: दिवाळी आता पंधरा दिवसांवर आली आहे. विविध कंपन्यांतील कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिले जात आहेत. भारतीय रेल्वेने यंदाही कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा पगार बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. काही खासगी कंपन्या कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिवाळी बोनस म्हणून देत आहे. चेन्नईमधील एका कंपनीने कर्मचाऱ्यांना हुंडई, टाटा, मारुती सुझुकी आणि मर्सिडिस बेन्झ या गाड्या दिल्या आहेत. स्ट्रक्चरल स्टील डिझाइन आणि डिटेलिंग कंपनी टीम डिटेलिंग सॉल्यूशन्सने आपल्या कर्मचाऱ्यांना 28 कार आणि 29 बाइक दिवाळी बोसन म्हणून दिले आहे.

यामुळे दिल्या गाड्या भेट

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर कन्नन यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांना त्यांच्या मेहनतीबद्दल आणि समर्पणाचे कौतुक म्हणून गाड्या भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यात हुंडई, टाटा, मारुती सुझुकी आणि मर्सिडिस बेन्झ यासारख्या गाड्या भेट म्हणून देण्यात आल्या आहेत. कंपनीच्या यशात कर्मचाऱ्यांचे असलेले प्रयत्न लक्षात घेऊन या भेटी देण्यात आल्या. कंपनीला पुढे नेण्यासाठी आमचे कर्मचारी ही सर्वात मोठी संपत्ती आहे. आमच्या कर्मचाऱ्यांची क्षमता लक्षणीय आहे.

कोणाला कसे दिले बोनस

श्रीधर कन्नन म्हणाले, कर्मचाऱ्यांना त्यांची कामगिरी, किती वर्षांची सेवा झाली आहे हे निकष लावून बोनस दिले आहे. कंपनीत 180 कर्मचारी आहे. ते सर्व साधारण परिवारातून आलेले लोक आहेत. त्यांच्यासाठी कार आणि बाईक घेणे एक स्वप्न असते. यामुळे कर्मचाऱ्यांना 28 कार भेट म्हणून दिल्या आहेत. त्यात हुंडई, टाटा, मारुती सुझुकी आणि मर्सिडिस बेन्झ यासारख्या गाड्या आहेत. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना दुसरी गाडी हवी असले तो फरकाची रक्कम त्याने भरल्यावर त्याला ती गाडी दिली गेली आहे. कंपनीने अनेक जणांना दुजाकी मोटारसायकलसुद्धा दिली आहे.

हे सुद्धा वाचा

लग्नासाठी कर्मचाऱ्यांना मदत

श्रीधर कन्नन यांनी सांगितले की, कार अन् बाईक सोबत कर्मचाऱ्यांना लग्नासाठीही मदत देत असतो. यापूर्वी कंपनी ५० हजार रुपये देत होती. आता ही रक्कम १ लाख करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या घरातील आनंदात सहभागी होण्याची संधी आम्हाला मिळते. तसेच आमच्या कर्मचाऱ्यांचे मनौधर्य वाढते. त्याचा परिणाम उत्पादन वाढीवर होतो.