“भारत माता की जय” मान्य नाही, या खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य, भाजपचा प्रहार, राहुल गांधी गप्प का?

| Updated on: Mar 06, 2024 | 11:08 AM

controversy statement | जय श्री राम आणि भारत माता की जय आम्ही कधीच मान्य करणार नाही. तामिळनाडू या घोषणांचा स्वीकार करणार नाही, असे वाद निर्माण करणारे वक्तव्य सत्ताधारी द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी केले आहे.

भारत माता की जय मान्य नाही, या खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य, भाजपचा प्रहार, राहुल गांधी गप्प का?
a raja
Follow us on

नवी दिल्ली | दि. 6 मार्च 2024 : हिंदू धर्मासंदर्भात वाद निर्माण करणारी वक्तव्य काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी केले होते. राजा यांनी सनातन धर्माची तुलना एचआयव्हीशी केली होती. त्या प्रकरणावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली होती. तो वाद आता शांत होत नाही तोपर्यंत त्यांनी पुन्हा नवीन वाद निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. भारत एक देश नाही तर उपमहाद्वीप आहे. “जय श्री राम” आणि “भारत माता की जय” या घोषणाही आम्हाला मान्य नाही. माझा प्रभू रामावर विश्वास नाही. खासदार राजा यांच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला आहे. भाजपने राहुल गांधी यांनी लक्ष केले आहे. “इंडिया आघाडीच्या” नेत्याकडून वादग्रस्त वक्तव्य झाल्यानंतर राहुल गांधी गप्प का? असा प्रश्न विचारला आहे.

काय म्हणाले खासदार राजा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त कोईम्बतूर एक सभा झाली. त्या सभेत ए. राजा यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केलीत. त्याचा भाषणासंदर्भात भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विट केले आहे. त्याचा अनुवाद करत अमित मालवीय यांनी राजा यांच्या भाषणात काय आहे, ते सांगितले आहे. त्यांनी म्हटले की, ‘भारत एक राष्ट्र नाही. भारत उपमहाद्वीप आहे. राष्ट्र म्हणजे एक भाषा, एक परंपरा आणि एक संस्कृती असते. भारतात असे काहीच नाही. या ठिकाणी तामिळ हे एक राष्ट्र म्हणजेच एक देश आहे. मल्याळम एक भाषा, एक राष्ट्र आणि एक देश आहे. ओरिसा एक राष्ट्र, एक भाषा आणि एक देश आहे, असे खासदार राजा यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

आम्ही रामाचे शत्रू

अमित मालवीय यांच्या म्हणण्यानुसार, ए राजा म्हणाले, ‘आम्ही रामाचे शत्रू आहोत. हा तुमचा देव, तुमचे जय श्री राम, तुमची भारत माता की जय असे म्हणत असाल, तर आम्हाला ते मान्य नाही.जय श्री राम आणि भारत माता की जय आम्ही कधीच मान्य करणार नाही. तामिळनाडू या घोषणांचा स्वीकार करणार नाही. तुम्ही जाऊन सांगा, आम्ही रामाचे शत्रू आहोत. मी रामायण आणि भगवान राम मानत नाही.

भाजपचा राहुल गांधींवर प्रहार

ए राजा यांचा व्हिडिओ भाजपा नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर शेअर केले. इंडिया आघाडीचे नेते देशविरोधी वक्तव्य करत असताना राहुल गांधी गप्प का बसले आहे, असे अमित मालवीय यांनी म्हटले आहे.