G20 Summit | भारत मंडपम संकुलातील नटराजच्या या मूर्तीचे महत्त्व तुम्हाला माहितीये का?

| Updated on: Sep 06, 2023 | 11:21 PM

G-20 शिखर परिषदेसाठी भारत मंडप संकुलात जगातील सर्वात उंच नटराज पुतळा बसवण्यात आला आहे. याचे एक विशेष महत्त्व आहे. काय ते जाणून घ्या,

G20 Summit | भारत मंडपम संकुलातील नटराजच्या या मूर्तीचे महत्त्व तुम्हाला माहितीये का?
Follow us on

G20 Summit Delhi | दिल्लीत होणाऱ्या G-20 परिषदेसाठी केंद्र सरकारने जवळपास सर्व तयारी पूर्ण केली आहे. प्रगती मैदानातील भारत मंडपम संकुलात याचं आयोजन करण्यात आले आहे. पण आकर्षणाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी मेणाच्या तंत्रज्ञानाद्वारे अष्टधातूपासून बनवलेली जगातील सर्वात उंच नटराजाची मूर्ती बसवण्यात आली आहे. ज्याची उंची 27 फूट, रुंदी 21 फूट आणि वजन सुमारे 18 टन आहे. श्री राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली स्वामीमलाई, तामिळनाडू येथील पारंपारिक कारागिरांनी शिल्पशास्त्रात नमूद केलेल्या तत्त्वे आणि मोजमापांचे पालन करून पारंपारिक मधुछिष्ठ पद्धतीने नटराजाची मूर्ती तयार केली आहे.

चोल काळापासून (इ.स. ९वे शतक) ही पद्धत नटराजाच्या मूर्तीच्या निर्मितीमध्ये अवलंबली जाते. श्री राधाकृष्णन यांचे कुटुंब चोल काळापासून हे कलाकुसर करत आले आहे. ते चोल काळातील वास्तुविशारदांच्या कुटुंबातील 34 व्या पिढीचा सदस्य आहेत. जी-20 अध्यक्षपदाच्या वेळी भारत मंडपासमोर बसवण्यात आलेली नृत्याची देवता शिव नटराजाची ही मूर्ती जगातील अष्टधातूपासून बनलेली सर्वात मोठी नटराजाची मूर्ती आहे.

ईश्वराचे हे रूप म्हणजे धर्म, तत्वज्ञान, कला, हस्तकला आणि विज्ञान यांचा समन्वय आहे. आनंद कुमारस्वामी यांच्या ‘डान्स ऑफ शिवा’ या पुस्तकाने न्यूक्लियर फिजिक्सच्या जगात विचारांची लाट निर्माण केली. फ्रिटजॉफ कॅप्रा यांच्या ‘द ताओ ऑफ फिजिक्स’ या प्रसिद्ध पुस्तकात नटराजाच्या रूपात शिवाच्या नृत्यावर एक संपूर्ण प्रकरण आहे. नृत्य करणाऱ्या देवाचे हे चिन्ह प्रतीकात्मकतेने परिपूर्ण आहे. संबंधित शास्त्रग्रंथांमध्ये दिलेले सममिती आणि प्रमाणाचे तपशीलवार नियम पाळणे हे देखील शिल्पकारासाठी आव्हान आहे.

पंजाबचे कलाकार डॉ. जगज्योत सिंग रुबल यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन जी-20 बैठकीत सहभागी होण्यासाठी भारतात येत असल्याचे अप्रतिम पेंटिंग बनवले आहे. जगज्योतने अमृतसरमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे 7 फूट लांब पेंटिंग बनवले आहे. हे चित्र बायडेन यांच्याकडे सोपवण्याची त्यांची इच्छा होती, परंतु त्यांना ते आता पेटिंग कुरिअर करणार आहेत. हे पेंटिंग व्हाईट हाऊसमध्ये प्रदर्शित व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. डॉ. जगज्योत सिंग रुबल यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींसह अनेक प्रमुख व्यक्तींची सात फूट लांबीची चित्रे बनवली आहेत. त्यांचे पीएम मोदींकडून कौतुक ही झाले आहे.