तपोवन (उत्तराखंड) : काही दिवसांपूर्वी तुर्कीच्या एका कुत्र्याचा व्हिडीओ समोर आला होता. मालक रुग्णालयात दाखल झाल्यानंतर कुत्र्याने रुग्णलयाच्या गेटवर ठाण मांडलं होतं. तो गेटवर मालकाची वाट पाहत बसला होता. गेटवर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला बऱ्याचदा तेथून हाकललं. मात्र, तरीदेखील तो कुत्रा पुन्हा तिथे येऊन आपल्या मालकाची वाट पाहायचा. अखेर आठ दिवसांनी त्याचा मालक रुग्णालयातून बाहेर येतो तेव्हा कुत्र्याचा आनंद गगनात मावत नव्हता. आता अगदी तशीच पण थोडीशी वेगळी घटना भारतात बघायला मिळत आहे. उत्तराखंडच्या तपोवन टनलबाहेर एक कुत्रा सलग तीन दिवसांपासून आपल्या मालकाची वाट पाहत उभा आहे. त्याला आपल्या मालकाचा जणू गंधच येतोय. मात्र, तो मालकाला शोधण्यात अयशस्वी ठरतोय (Dog waiting outside Tapovan tunnel for the men he knew).
उत्तराखंडच्या तपोवन टनलमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम अद्यापही सुरुच आहे. बचाव कार्य सलग तीन दिवसांपासून दिवसरात्र सुरु आहे. एनडीआरएफचे जवान प्रचंड मेहनत करुन लोकांचा शोध घेत आहेत. आतापर्यंत टनलमधून 35 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या टनलबाहेर एक कुत्रा आपल्या मालकाची वाट पाहत उभा आहे. गेल्या तीन दिवसांपासून तो टनलबाहेर आपल्या मालकाची वाट पाहतोय. त्याला बचाव कार्याच्या जवानांनी अनेकदा हटकलं तरी तो पुन्हा तिथेच येऊन आशेने टनलच्या दिशेला बघत असतो.
उत्तराखंडच्या जोशीमठ येथे तीन दिवसांपूर्वी मोठा अपघात झाला. नंदादेवी पर्वतचा एक भाग कोसळल्याने तिथे नदीला महापूर आला. या महापुरात अनेक लोक वाहून गेले. या घटनेमुळे चमोली येथील ऋषीगंगा पावर प्रोजेक्ट पूर्णपणे उद्धवस्त झाला. त्याचबरोबर तपोवन टनलमध्ये देखील पाणी घुसलं. या टनलमध्ये अनेक कर्मचारी काम करत होते. या टनलमधून आतापर्यंत अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, तरीही अनेक लोक बेपत्ता आहे.
या घटनेमुळे रैनी गाव जास्त प्रभावित झालं आहे. रैनी गावातील अनेक नागरिकांचा या घटनेत दुर्देवी मृत्यू झाला. घटना घडल्यापासून एक व्यक्ती बेपत्ता आहे. तो व्यक्ती रैनी गावाचाच आहे. या व्यक्तीला शोधत शोधत त्याचा कुत्रा तपोवन टनलपर्यंत येऊन पोहोचला आहे. टनलमधून जी व्यक्ती येते त्याच्याकडे तो आशेने बघतो. मात्र, त्याचा भ्रमनिरास होतोय. या कुत्र्याबाबत बचाव कार्याच्या जवानांना देखील अप्रूप वाटतंय (Dog waiting outside Tapovan tunnel for the men he knew).
It’s been three days since the Bhutia dog is waiting outside Tapovan tunnel for the men he knew. As the rescue operation is underway to locate the people, the black dog sits at the Tapovan hydel project site in an unending wait for its friend who reared him. pic.twitter.com/jCAqAn0DUT
— Vivek Singh (@VivekSi81873641) February 11, 2021
हेही वाचा : इमानदार ! मालक हॉस्पिटलमध्ये, दोस्तानं गेटवर ठाण मांडलं !