नवी दिल्लीः भारतीय बनावटीच्या भारतीय 5Gi तंत्रज्ञानाच्या नमनालाच घडाभर तेल ओतलं गेले आहे. या देशी बनावटीच्या 5Gi तंत्रज्ञानावर दूरसंचार कंपन्यांनी (Telecom Company) तीव्र आक्षेप घेतला. परिणामी दूरसंचार विभाग (Department of Telecommunications (DoT) ) 5 जी साठी स्वतंत्र भारत-विशिष्ट मानक अर्थात 5 जी सुरू करण्याची योजना पहिल्या टप्प्यातच गुंडाळून ठेवावी लागली. खरं पाहता ही नामुष्की ओढवून घेण्यासारखे आहे. कारण एका ही कंपनीने भारतीय बनावटीच्या या तंत्रज्ञानावर विश्वास दाखवला नाही. आंतरराष्ट्रीय मानकांच्या (International 5G Standard) कसोटीवर हे तंत्रज्ञान धोक्याचे असल्याचा दावा कंपन्यांनी केला. त्यांनी दूरसंचार विभागाला याविषयीची मते कळवली. डिसेंबरमध्ये तिसऱ्या पिढीतील भागीदारी प्रकल्पाने (३जीपीपी) ५जीआयचे ३जीपीपीच्या जागतिक ५जी मानकात विलीनीकरण करण्यास मान्यता दिली होती.
भारती एअरटेल (Bharti Airtel), व्होडाफोन आयडिया (VI), क्वालकॉम (Qualcomm) आणि जगातील अव्वल दूरसंचार कंपन्यांनी या देशी बनावटीच्या तंत्रज्ञानाला तीव्र विरोध केला. हे तंत्रज्ञान धोकादायक आहे. त्यामुळे दूरसंचार सेवा संबंधित सर्व डिव्हाईस बदलण्याची झंझट उभी राहिल, ही खर्चिक बाब ठरेल. जॅक अप रोल आऊट आणि 5 जी स्मार्टफोन तंत्रज्ञान तसेच हार्डवेअर व सॉफ्टवेअर मध्ये आवश्यक बदल करावे लागतील. परिणामी सहाजिकच खर्च वाढेल. आंतरिक काम करण्याची क्षमता (interoperability) प्रभावित होऊन त्यामुळे भारतीय बनावटीची 5 जी सेवा देण्यासाठी ची योजना मोडकळीस येईल.
हँडसेट कंपन्या आणि व्यापार संस्थांसह भारतीय टेल्कोस, गिअर आणि चिपसेट विक्रेते 3 जीपीपीच्या जागतिक 5 जी मानकाशी सुसंगततेच्या मुद्द्यांवर स्वदेशी बनावटीच्या तंत्रज्ञानाला घेरत आहेत. त्यांचा 5 जीआयच्या राष्ट्रीय मानक म्हणून समाविष्ट करण्यास विरोध आहे, जे व्यावसायिक थेट नेटवर्कसाठी आधीच जागतिक स्तरावर स्वीकारले गेले आहे. टेल्कोसने डीओटी आणि टीईसीला स्केल साध्य करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी 5 जीआयला 3 जीपीपीच्या जागतिक 5 जी मानकांमध्ये विलीन करण्याचे आवाहन दिले आहे.
ऑपरेटर्सना मोठा दिलासा देताना, दूरसंचार मानक विकास सोसायटी ऑफ इंडियाने (TSDSI), दूरसंचार अभियांत्रिकी केंद्राला (TEC) 5 जी ला राष्ट्रीय मानक म्हणून स्वीकारण्याची प्रक्रिया पुढे न नेण्याची सूचना 25 जानेवारी रोजी केली. टीएसडीआयने इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनलाही (ITU) माहिती दिली आहे. स्थानिक मानके म्हणून जागतिक 5 जी मानकांचे पालन करत राहणार असल्याची माहितीही टीएसडीएसआयने एका निवेदनात दिली आहे. डिसेंबरमध्ये तिसऱ्या पिढीतील भागीदारी प्रकल्पाने (3 GPP) 5जीआयचे 3 जीपीपीच्या जागतिक 5 जी मानकात विलीनीकरण करण्यास मान्यता दिली होती.
संबंधित बातम्या