नवी दिल्ली: उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे (DPIIT)सचिव डॉ. गुरुप्रसाद महापात्रा (Dr. Guruprasad Mohapatra) यांचं निधन झालं. केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी याबाबतची माहिती दिली. गुरुप्रसाद महापात्रा हे विमानतळ प्राधिकरणाचेही अध्यक्ष होते. विमानतळ प्राधिकरणाला नवी दिशा देण्यासाठी माहापात्रा यांनी मोठं काम केलं. महापात्रा यांच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. (DPIIT Secretary Guruprasad Mohapatra Passed away due to post covid complications PM Modi express grief)
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याचं नियंत्रण करणारे डॉ. गुरुप्रसाद मोहपात्रा यांचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं आहे. कोरोना बरा झाल्यानंतर प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांचं निधन झालं. डॉ.गुरुप्रसाद महापात्रा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
Saddened by the demise of Dr. Guruprasad Mohapatra, DPIIT Secretary. I had worked with him extensively in Gujarat and at the Centre. He had a great understanding of administrative issues and was known for his innovative zeal. Condolences to his family and friends. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) June 19, 2021
गुरुप्रसाद महापात्रा यांच्या निधनामुळे दु:ख झालं. मी त्यांच्यासोबत गुजरात आणि केंद्र सरकारमध्ये काम केल आहे. प्रशासकीय समस्या सोडवण्याची त्यांना चांगली जाण होती. नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी ते ओळखले जायचे. मोहपात्रा यांच्या कुटुंबीयांसोबत संवेदना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.
गुरुप्रसाद महापात्रा हे 1986 च्या बॅचचे गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी होते. 19 एप्रिल रोजी ते कोरोना बरा झाल्यानंतर झालेल्या प्रकृतीच्या समस्येमुळे एम्समध्ये दाखल झाले होते. पुढील वर्षी 30 एप्रिल 2022 रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. गुजरातमधील सुरत महापालिकेमध्ये त्यांनी 1999-2002 या कालावधीमध्ये आयुक्त म्हणून देखील काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑ इंडियाचं चेअरमनपद भूषवलं. अहमदाबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं. साबरमती नदी प्रकल्प, बीआरटीएस, कनकारिया लेक फ्रंट आदी प्रक्लपांच्या विकासकामात महापात्रा यांचं योगदान होतं.
Extremely saddened to hear about the loss of Dr. Guruprasad Mohapatra, Secretary DPIIT.
His long-standing service and dedication to the Nation have left a lasting impact. I convey my deepest sympathies to his family and friends.
ॐ शांति pic.twitter.com/JFwZJFDE1b
— Piyush Goyal (@PiyushGoyal) June 19, 2021
केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी डॉ.गुरुप्रसाद महापात्रा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. गुरुप्रसाद महापात्रा यांनी देशाची सेवा मोठ्या समर्पणाच्या भावनेतून केली, अशा शब्दांत गोयल यांनी महापात्रा यांना आदरांजली वाहिली.
संबंधित बातम्या:
Gold Rate Today : जळगावात सोनेदरात तब्बल दीड हजारपेक्षा अधिक रुपयांनी घसरण, तोळ्याचा भाव किती?
लॉकडाऊन पूर्णपणे हटवणारं पहिलं राज्य, ‘या’ राज्याने संपूर्ण लॉकडाऊन हटवला
(DPIIT Secretary Guruprasad Mohapatra Passed away due to post covid complications PM Modi express grief)