DRI ची धडक कारवाई, मुंबई विमानतळावरून 3.7 कोटी डॉलर्स, दिल्ली विमानतळावरून 85 किलो सोने जप्त

| Updated on: Nov 27, 2021 | 7:00 AM

शुक्रवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शारजाला (Sharjah) जाणाऱ्या प्रवाशांनांकडून 3.7 कोटी मूल्याचे अमेरिकी डॉलर्स आणि सौदी दिऱ्हाम्स (US Dollars and Saudi Dirhams) जप्त करण्यात आले. 

DRI ची धडक कारवाई, मुंबई विमानतळावरून 3.7 कोटी डॉलर्स, दिल्ली विमानतळावरून 85 किलो सोने जप्त
डॉलर
Follow us on

मुंबईः ऑपरेशन चेक शर्ट्स (Operation Check Shirt) अंतर्गत महसूल गुप्तचर संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence) धडक कारवाई करत विदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या दोन प्रवाशांना मुंबईत अटक केली. शुक्रवारी सकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शारजाला (Sharjah) जाणाऱ्या प्रवाशांनांकडून 3.7 कोटी मूल्याचे अमेरिकी डॉलर्स आणि सौदी दिऱ्हाम्स (US Dollars and Saudi Dirhams) जप्त करण्यात आले.

स्कॅनिंगमध्ये हे चलन सापडणार नाही अशा प्रकारे बॅगेच्या तळाशी लपवण्यासाठी विशिष्ट प्रकारची रचना करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेले विदेशी चलन, सीमा शुल्क कायदा, 1962- कलम 110 अन्वये अवैध आसून, त्या दोन प्रवाशांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

दिल्ली विमानतळाच्या एअर कार्गोत 85 किलो सोने जप्त

याआधी DRI ने, तैवान- दक्षिण कोरिया- हाँगकाँग या मार्गाच्या एअर कार्गोद्वारे 42 कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला. हे सोने मशिनरी पार्ट्सच्या स्वरूपात आणले जात असल्याची माहिती मिळाली होती. दिल्ली विमानतळाच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये तपासणी सुरू केली असता, ट्रान्सफॉर्मरला बसवलेले इलेक्ट्रो प्लेटिंग मशिनमध्ये सोने लपवल्याचे आढळले.

1 किलो सोने एका मशीनमध्ये ठेवण्यात आले होते. अशा प्रकारे एकूण 80 मशिनमधून हे सोने जप्त करण्यात आले. सुमारे 42 कोटी रुपयांचे 85 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. तस्करीची पद्धत पूर्वीच्या घटनेशी तंतोतंत जुळते, ज्यामध्ये दिल्लीतील एका ज्वेलर्सने त्याच पद्धतीने सोन्याचे भाग इलेक्ट्रॉनिक उपकरणात लपवून तस्करी केली होती. DRI ने ही माहिती दिली.

पकडलेल्या टोळीने या ट्रान्सफॉर्मरमधून सोने काढण्यासाठी, दक्षिण दिल्ली आणि गुरुग्राम येथे फार्म हाऊस भाड्याने घेतले होते. ट्रान्सफॉर्मरमधून सोने वेगळे करून पुढे पुरवठा करण्याचा प्लॅन होता. भारतात ही सोन्याची तस्करी 4 परदेशी नागरिक करत होते, ज्यात 2 दक्षिण कोरिया, 1 चीन आणि एक तैवान नागरीकाचा समावेश आहे.

इतर बातम्या

15 डिसेंबरपसून भारताच्या सर्व आंतरराष्ट्रीय हवाई सेवा पुन्हा सामान्य होणार, मात्र नवीन कोविड स्ट्रेनमुळे ‘या’ 14 देशांना वगळलं

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली, AIIMS दिल्लीच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल