नवी दिल्ली, दि.2 फेब्रुवारी 2024 | सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. आपण कोणतीही गोष्टी घरी बसल्या बसल्या मागवू लागलो आहे. घरातील किराणा असो की भाजीपाला ऑनलाईन बुक करायचा काही तासांत डिलेव्हरी घरी मिळते. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या वेबसाईट सर्वच वस्तू मिळतात. कधी वस्तू वेळेत मिळाली नाही तर कस्टमर हेल्पलाइनवरुन मदत मिळते. मग ऑनलाइनचा हा फंडा उत्तर प्रदेशातील एका डेअरी व्यापाऱ्याने वापरला. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने चक्क म्हैस बुक केली. त्यानंतर मात्र त्याची अडचण झाली. अखेर प्रकरण पोलिसांपर्यंत गेले.
उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे डेअरी चालवणारे सुनील कुमार यांनी यूट्यूबवर एका म्हशीचा व्हिडिओ पहिला. त्यांना ती म्हैस आवडली. युट्यूबर दिलेल्या व्हिडिओत फोन नंबर दिला होता. म्हैस विकणार जयपूर येथील व्यापारी शुभम होता. त्यांनी म्हैस खूप चांगल्या जातीची आहे. रोज 18 लीटर दूध देते, असे सांगितले.
शुभम यांनी त्या म्हैसीचा आणखी एक व्हिडिओ पाठवला. त्यानंतर सुनील कुमार यांनी म्हैस खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. शुभम यांनी किंमत विचारली. त्यांनी 55 हजार रुपये किंमत सांगितली. जर म्हैस खरेदी करायचे असेल तर आधी 10 हजार रुपये माझ्या खात्यात पाठवा. त्यानंतर म्हैस तुमच्या घरी येईल. म्हैस घरी आल्यावर उर्वरित पैसे ट्रक ड्रायव्हरला द्या, असे सांगितले.
सुनील कुमार यांनी त्यांना दहा हजार रुपये पाठवले. परंतु म्हैस घरी आली नाही. त्यांनी शुभम याला फोन केला. त्यानंतर अजून 25 हजार रुपये पाठवण्याचे सांगितले. त्यानंतर सुनील कुमार यांना शंका आली. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. आता या प्रकरणात पोलीस चौकशी करत आहे. सुनील कुमार यांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहे. पोलिसांनी ऑनलाईन खरेदी करताना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.