‘अखंड भारता’ची विचारधारा, शंकर महादेवनकडून RSS च कौतुक, ‘या’ भाजपा नेत्याकडून खास टि्वट

| Updated on: Oct 25, 2023 | 1:47 PM

शंकर महादेवन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘अखंड भारता’च्या विचारधारेच समर्थन, कौतुक केलं. त्यानंतर एका केंद्रीय मंत्र्याने शंकर महादेवन यांचं अभिनंदन करणारी सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली. RSS च्या विजयादशमीच्या कार्यक्रमात शंकर महादेवन सहभागी झाले होते.

‘अखंड भारता’ची विचारधारा, शंकर महादेवनकडून RSS च कौतुक, या भाजपा नेत्याकडून खास टि्वट
shankar mahadevan
Follow us on

नागपूर : विजयादशमीच्या निमित्ताने नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ‘दसरा’ कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी शंकर महादेवन यांनी आरएसएसच्या कार्याच कौतुक केलं. ‘अखंड भारता’ची विचारधारा, परंपरा आणि संस्कृती पुढे नेण्यात आरएसएसच मोठ योगदान आहे अशा शब्दात शंकर महादेवन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच कौतुक केलं. त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी X वर पोस्ट करुन शंकर महादेवन यांचं कौतुक केलय. “तुम्ही तुमच्या संगीताने देशाची मुल्य आणि भारताच्या शाश्वत संस्कृतीच प्रदर्शन केल्याबद्दल पद्म श्री शंकर महादेवन यांचं मी अभिनंदन करतो” असं धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शंकर महादेवन म्हणाले की, “मी खरच नशिबवान आहे. मला या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली” या कार्यक्रमात संघाच्या स्वयंसेवकांनी ‘पथ संचलन’ केलं. मागच्यावर्षी विजयादशमीच्या कार्यक्रमात RSS कडून पहिल्यांदा एका महिलेला मुख्य अतिथी म्हणून बोलवण्यात आलं होतं. मागच्यावर्षीच्या संघाच्या कार्यक्रमाला दोनवेळा माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या संतोष यादव मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी सर्वप्रथम 1992 आणि त्यानंतर 1993 साली माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम केला होता.


‘या’ समितीमध्ये शंकर महादेवन यांचा समावेश

शिक्षण मंत्रालयाने एनसीईआरटीच्या 3 ते 12 वी पर्यंतच्या पुस्तक तयार करण्याच्या समितीमध्ये शंकर महादेवन यांचा समावेश करण्यात आला आहे. महादेवन यांच्यासह समितीमध्ये एकूण 19 लोक आहेत.