ED arrest : अंमलबजावणी संचालनालयाला मोठे यश मिळाले आहे. कारण ईडीने दिल्लीच्या IGI विमानतळावरून एका मोठ्या आरोपीला अटक केली आहे. ईडीचे म्हणणे आहे की आरोपीने सायबर क्राईम आणि ऑनलाइन गेमिंगद्वारे सामान्य लोकांची 5000 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आल्याचेही ईडीने म्हटले आहे. हे आरोपी फसवणुकीचा पैसा लाँडरिंग करण्यासाठी भारताबाहेर पाठवत असत.
अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी सांगितले की, सायबर गुन्हे आणि ऑनलाइन गेमिंगद्वारे सामान्य लोकांकडून सुमारे 5,000 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात आणखी एका आरोपीला अटक केलीये. पुनीत कुमार उर्फ पुनीत माहेश्वरीला 3 एप्रिल रोजी नेपाळहून आल्यानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-3 वरून अटक करण्यात आली, असे एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे.
दिल्लीच्या मोती नगर भागात राहणाऱ्या कुमारवर सायबर गुन्ह्यांमधून सर्वसामान्यांची फसवणूक करणे, गुन्ह्यातून मिळालेली रक्कम लाँडरिंग करणे आणि त्यांना भारताबाहेर पाठवल्याचा आरोप आहे.
पुनित कुमार उर्फ पुनित माहेश्वरी याने संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये असलेल्या सर्व्हरचा वापर करून लोकांची फसवणूक केली आहे. गेल्या महिन्यात ईडीने याच प्रकरणात आणखी एक आरोपी आशिष कक्करला गुरुग्राममधील हॉटेलमधून अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहे. हे मनी लाँड्रिंग प्रकरण दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणा आणि इतर काही ठिकाणी दाखल पोलिस एफआयआरशी संबंधित आहे.