कोलकाता- प. बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्यात कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister)पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी (Arpita Mukharjee)यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात ईडीने कोलकाता हायकोर्टात महत्त्वाची माहिती समोर ठेवली आहे. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा एका काळ्या डायरीबाबतचा (Black Diary)आहे. ही काळी डायरी पार्थ चॅटर्जी यांची नीकटवर्तीय अभिनेत्री अर्पिता मुखर्जी हिच्या घरातून जप्त करण्यात आलेली आहे. सोमवारी या प्रकरणा अर्पिताची चौकशी प्रत्येक ४८ तासांला करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत त्यांची चौकशी करु नये असेही कोर्टाने सांगितले आहे. दरम्यान पार्थ चॅटर्जी यांना मंगळवारी कोलकात्यात आणण्यात आले. आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे अहवालातून सांगण्यात आले आहे. त्यांच्यावर नजर ठेवण्यात येते आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसचे आणखी एक आमदार माणिक भट्टाचार्य यांचीही ईडी चौकशी करणार आहेत.
“I don’t want to comment on it as the matter is sub-judice. An investigation is underway. CM has categorically said that if anything adverse comes then govt will take action”: West Bengal Assembly Speaker Biman Banerjee on Partha Chatterjee pic.twitter.com/YpPtLNCwtW
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) July 26, 2022
४० पानांच्या या डायरीत शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित महत्त्वाच्या नोंदी असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. यातल्या ४० पैकी १६ पानांवर बेकायदेशीररित्या घेतलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीचा उल्लेख आहे. उच्च शिक्षण विभागाचे एक पाकिटही अर्पिताच्या घरी सापडले असून त्यात ५ लाखांची कॅश असल्याचे ईडीने सांगितले आहे. दोन कंपन्यांत पैसे व्यवहाराचे पुरावेही मिळाले आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातूनच घोटाळ्याची रक्कम ट्रान्सफर करण्यात आल्याचा ईडीचा दावा आहे. या सगळ्या काळात पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी हे एकमेकांशी संपर्कात होते असेही स्पष्ट होते आहे. अजूनही काही महत्त्वाची कागदपत्रे या ठिकाणी मिळालू असून त्यात पार्थ यांची या घोटाळ्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अर्पिताला मुखर्जीला सोमवारी कोर्टात सादर करण्यात आले. त्याच्या आधी अर्पिताने पार्थ चॅटर्जी यांच्याशी असलेले संबंध आणि उत्पन्नाच्या साधनाबाबत कोणतीही माहिती ईडीला दिली नसल्याचे सांगण्यात आले आहे. पार्थ आणि अर्पिता यांचा एकमेकांशी संबंध दाखवण्याचा प्रयचत्न ईडीकडून करण्यात येतो आहे, असे अर्पिता यांचे म्हणणे आहे.