VIDEO | शिकारच्या शोधात 8 सिंह गावात घुसले, सीसीटीव्ही पाहा कसे ऐटीत चालतायत सिंह

| Updated on: Feb 15, 2023 | 11:36 PM

गुजरातमधील एका गावात तब्बल 8 सिंहाचा कळप शिरल्याची घटना नुकतीच समोर आलीय. हे सिंह शिकाराच्या शोधासाठी गावात शिरल्याची माहिती आहे. संबंधित घटना गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.

VIDEO | शिकारच्या शोधात 8 सिंह गावात घुसले, सीसीटीव्ही पाहा कसे ऐटीत चालतायत सिंह
Follow us on

गांधीनगर : वाघ किंवा सिंह (Lion) आपल्या गावात किंवा शहरात शिरला तर? असा प्रश्न मनात पडला तर अंगावर शहारे येतात. तसं कधीच घडू नये असा विचार आपल्या मनात नंतर येऊन जातो. पण हल्ली गावांमध्ये वाघ किंवा सिंह घुसण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी कल्याण सारख्या शहरात दाटीवाटीच्या वस्तीत बिबट्या शिरल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती. बिबट्याने त्यावेळी अनेकांना जखमी केलं होतं. फक्त कल्याणच नाही तर नाशिकमध्येही तशी घटना घडली होती. या घटना ताज्या असताना आता गुजरातलामधला एक धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय.

गुजरातमधील एका गावात तब्बल 8 सिंहाचा कळप शिरल्याची घटना नुकतीच समोर आलीय. हे सिंह शिकाराच्या शोधासाठी गावात शिरल्याची माहिती आहे. संबंधित घटना गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.

हे सुद्धा वाचा

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आठ सिंह कैद झाले आहेत. ते मोठ्या रुबाबात गावात फिरताना दिसत आहेत. त्यांना गावकऱ्यांकडून आपल्यावर हल्ला होईल किंवा पिटाळून लावलं जाईल, असं काहीच वाटत नाहीय. कारण त्यांच्या बॉडी लँग्वेजवरुन ते जाणवतंय.

गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

दुसरीकडे सिंह गावात शिरल्याची बातमी समोर आल्यानंतर अमरेली येथीस रामपर गावाच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागरिकांमध्ये या सिंहांची प्रचंड दहशत निर्माण झालीय.

शिकाराच्या शोधासाठी सिंहांचा हा कळप गावात शिरला. त्यानंतर चालला गेला. पण ते पुन्हा गावात येऊ शकतात आणि त्यामुळे गावकऱ्यांच्या जीवाला धोका उद्धभवू शकतो, अशी चर्चा सध्या गावकऱ्यांमध्ये आहे.

संबंधित व्हिडीओ हा अमरेलीच्या रामपर गावातील आहे. आठ सिंहांचा हा कळप मंगळवार-बुधवार दरम्यान रात्रीच्यावेळी गावात शिरला होता. शिकारच्या शोधासाठी सिंह गावात बराच वेळ फिरले. त्यानंतर ते तिथून निघून गेले.

सकाळ झाल्यानंतर गावात सिंह आल्याची बातमी पसरली. त्यामुळे गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला. सिंह गावात पुन्हा येऊ शकतात. त्यामुळे कुणाच्याही जीवाला धोका उद्धभू शकतो, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.