जादू फक्त गुजरातमध्येच? लोकसभा आणि विधानसभेच्या सात पोटनिवडणुकांमध्ये भाजपची स्थिती काय?

| Updated on: Dec 08, 2022 | 12:55 PM

उत्तर प्रदेशातील मैनपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव होताना दिसत आहे. समाजवादी पार्टीच्या उमेदवार डिंपल यादव यांनी आघाडी घेतली आहे.

जादू फक्त गुजरातमध्येच? लोकसभा आणि विधानसभेच्या सात पोटनिवडणुकांमध्ये भाजपची स्थिती काय?
जादू फक्त गुजरातमध्येच? लोकसभा आणि विधानसभेच्या सात पोटनिवडणुकांमध्ये भाजपची स्थिती काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभआ निवडणुकीचे कल समोर आले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तर हिमाचल प्रदेशातली सत्ता मात्र, भाजपला गमवावी लागली आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या सात विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे भाजपची जादू फक्त गुजरातपुरतीच मर्यादीत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

उत्तर प्रदेशातील मैनपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव होताना दिसत आहे. समाजवादी पार्टीच्या उमेदवार डिंपल यादव यांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी तब्बल 78 हजारांची आघाडी घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपच्या रघुराज शाक्य यांना 84099 मते मिळाली असून डिंपल यादव यांना 162136 मते मिळाली आहेत. म्हणजे त्या 78037 मतांनी आघाडीवर आहेत. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.

रामपूर सदरमध्येही भाजप पिछाडीवर

उत्तर प्रदेशातील रामपूर सदरमध्येही भाजप पिछाडीवर आहे. समाजवादी पार्टीचे आसिम राजा हे आघाडीवर आहेत. त्यांनी भाजपचे आकाश सक्सेना यांना पिछाडीवर टाकलं आहे. राजा हे 4244 मते घेऊन आघाडीवर आहेत.

खतौलीही हातची जाणार

खतौली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप पराभवाच्या छायेत आहे. आलएलडीचे उमेदवार मदन भैया 8534 मते घेऊन आघाडीवर आहेत. आरएलडीच्या उमेदवाराला 3295 तर भाजपच्या उमेदवाराला 24381 मिळाली आहेत.

कुढनीतही पिछाडीवर

बिहारच्या कुढनी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप पिछाडीवर आहे. 11 व्या फेरीअखेर जेडीयूचा उमेदवार 1176 मतांनी आघाडीवर आहे. या ठिकाणी भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे.

छत्तीसगडही हाती नाही

छत्तीसगडच्या भानुप्रतापपूर जागेवर काँग्रेस भाजपला मात देताना दिसत आहे. काँग्रेसच्या सावित्री मनोज मांडवी या विजयाच्या दिशेने कूच करताना दिसत आहेत. त्या 12436 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे ब्रह्मानंद नेताम पिछाडीवर आहेत. त्या शिवाय इतर दोन जागांवरही भाजप पिछाडीवर असल्याचं चित्रं आहे.