Atique Ahmed | ‘एन्काऊंटर होगा या फिर पोलीस..’; 19 वर्षांपूर्वीच अतिक अहमदने केली होती त्याच्या मृत्यूची भविष्यवाणी

| Updated on: Apr 16, 2023 | 5:14 PM

अतिक अहमदने 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत फुलपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा दावा केला होता. त्याने ही निवडणूक जिंकली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना अतिकने त्याच्या मृत्यूविषयी भिती व्यक्त केली होती.

Atique Ahmed | एन्काऊंटर होगा या फिर पोलीस..; 19 वर्षांपूर्वीच अतिक अहमदने केली होती त्याच्या मृत्यूची भविष्यवाणी
Atique Ahmed
Follow us on

प्रयागराज : गुन्हेगारी विश्वातून राजकारणातून आलेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांची शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात नेताना पोलिसांच्या ताब्यात असताना हा हल्ला झाला. मात्र 19 वर्षांपूर्वीच अतिकने त्याच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान अतिक अहमदने त्याच्या मृत्यूबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. “एन्काऊंट होईल किंवा पोलीस मारतील किंवा मग आमच्याच समाजातील एखादा वेडा माणूस जीव घेईल. रस्त्याच्या कडेला पडलेला भेटेन”, असं तो म्हणाला होता. आपल्याच गँगमधील एखादा माफिया आपली हत्या करू शकतो, अशी त्याला भीती होती. 19 वर्षांनंतर अखेर त्याची ही भीत खरी ठरली.

अतिक अहमदने 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत फुलपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा दावा केला होता. त्याने ही निवडणूक जिंकली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना अतिकने त्याच्या मृत्यूविषयी भिती व्यक्त केली होती. अतिक हा अलाहाबाद पश्चिम मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आला होता. फुलपूरमधून तो खासदारकीची निवडणूक लढवत होता.

“परिणाम सर्वांना माहीत असतात”

प्रयागराजमध्ये त्याने काही निवडक पत्रकारांसोबत संवाद साधला होता. यादरम्यान एकदा त्याने मृत्यूबद्दल वक्तव्य केलं होतं. प्रयागराजमध्ये 15 एप्रिल रोजी ज्या प्रकारची घटना त्याच्यासोबत घडली, तशाच प्रकारच्या अंताची त्याने चर्चा केली होती. “गुन्हेगार म्हणून आपलं भविष्य किंवा शेवट काय होणार हे आम्हाला माहीत असतं. ही परीक्षा किंवा परिस्थिती टाळण्यासाठी किंवा जे घडणार आहे ते पुढे ढकलण्यासाठी आम्ही दररोज संघर्ष करत असतो”, असं तो म्हणाला होता.

हे सुद्धा वाचा

नेहरुंशी अशी केली होती तुलना

पत्रकारांशी बोलताना अतिकने त्याची तुलना देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी वेगळ्याच अंदाजात तुलना केली होती. पंडित नेहरू हे फुलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर पंतप्रधान झाले होते. 2004 च्या निवडणुकीत अतिकने त्याच मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. “माझ्यात आणि पंडितजींमध्ये एकच साम्य आहे आणि ते म्हणजे आम्ही दोघांनी फुलपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मी त्यांच्यासारखाच नैनी तुरुंगात राहिलो होतो”, असं तो म्हणाला होता.