कोट्टायम : केरळच्या कोट्टायम जिल्ह्यात घडलेल्या एका दुःखद घटनेत एका कुटुंबातील सर्व सहा सदस्यांनी आपला जीव गमावला. कोट्टायमध्ये आठवड्याच्या शेवटी झालेल्या पूर आणि भूस्खलनामध्ये या सहा जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
सोमवारी (18 ऑक्टोबर) संध्याकाळी त्यांच्या मूळ जिल्ह्यातील कवली सेंट मेरी चर्चमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बिशप मार जोसेफ कलरंगट्ट यांनी लोकांच्या आणि केरळ मंत्रिमंडळातील मंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले.
कुटुंबप्रमुख मार्टिन, त्यांची पत्नी सिनी, त्यांच्या मुली स्नेहा, सोना आणि सँड्रा आणि त्यांची आजी क्लारम्मा शनिवारी त्यांच्या जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनामध्ये मृत्यू पावल्या. त्यांचे कुटुंब कावली येथील एका चर्चजवळ राहत होते. हे ठिकाण भूस्खलनामुळे खूप प्रभावित झालेल्या कुट्टिकल, कोट्टायममधील ठिकाणांपैकी एक होते.
मार्टिन कुटुंबाव्यतिरिक्त, त्यांच्या शेजाऱ्यांची घरेही रहिवाशांसह वाहून गेल्याचे सांगितले जाते. भूस्खलनामुळे, शहराचा बराचशा भागाचा संपर्क तुटला आहे.
Extremely sad instance of clergy having to perform final rituals for a family, where all six members perished in the #KeralaRains #KeralaFloods in kollam district
Couple, their three daughters and the grandmother (3 generations) gone too soon.. pic.twitter.com/YbaqJ6LgNh
— Sidharth.M.P (@sdhrthmp) October 18, 2021
केरळमध्ये भूस्खलनामुळे 24 जणांचा मृत्यू
केरळमध्ये निसर्गान थैमान घातलं आहे, इथं मुसळधार पावसानंतर पुन्हा एकदा भूस्खलनाच्या घटना सुरु झाल्या आहेत. केरळमधील कोट्यायमचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर कुणाचाही थरकाप उडेल. इथल्या मुंडकायममध्ये रविवारी मुसळधार पावसामुळे एक घर वाहून गेलं. केरळमध्ये शनिवारपासून मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे किमान 24 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारपर्यंत पाऊस थांबला होता, पण तरीही प्रशासनाने भूस्खलनाच्या धोक्यावर बारीक नजर ठेवली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी 11 जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला होता. गंभीर हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीला सामोरे मदत देऊ केली आहे.
कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यातील डोंगराळ भागात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अचानक पूर आला आणि त्यातच झालेल्या भूस्खलनामुळे लोकांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. इडुक्कीच्या जिल्हा दंडाधिकारी शीबा जॉर्ज यांनी सांगितले की खराब हवामानामुळे इडुक्कीच्या डोंगराळ भागात प्रवासावर बंदी आहे. “आतापर्यंत नऊ मृतदेह सापडले आहेत. दोन लोक बेपत्ता आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा केली.
Video | Kerala Flood | केरळमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरुच, पुरात कोट्टायममध्ये घरचं गेलं वाहून #Kerala #Flood #Rain #Kottayam #HomeCollapse pic.twitter.com/I1HG3mhc8R
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2021
संबंधित बातम्या :