EVM Hacking : 53 कोटींत 63 ईव्हीएम मशीन हॅक करण्याचा दावा, मग मुंबई पोलीस अन् निवडणूक आयोगाने उचलले हे पाऊल

| Updated on: Dec 02, 2024 | 2:34 PM

EVM Hacking in Maharashtra Assembly Election Result: व्हिडिओत अमेरिकन हॅकर सैयद शुजा असल्याचा दावा केला जात आहे. तो कोणाच्याही बाजुने निवडणूक निकाल लावू शकत असल्याचा दावा करत आहे. त्यासाठी त्याला व्हीव्हीपॅट मशिनचे नंबर मला हवेत. हे नंबर रिटेरिंग ऑफिसर देईल, असे तो म्हणतो.

EVM Hacking : 53 कोटींत 63 ईव्हीएम मशीन हॅक करण्याचा दावा, मग मुंबई पोलीस अन् निवडणूक आयोगाने उचलले हे पाऊल
evm hacker
Follow us on

Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निकालात महायुतीला मोठे यश मिळाले. महाविकास आघाडीला मोठा झटका बसला. त्यानंतर सर्वत्र ईव्हीएम हॅक करण्याची चर्चा सुरु झाली. महाविकास आघाडीकडूनही ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. दरम्यान, सोशल मीडियावर ईव्हीएम हॅक करण्यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला. 53 कोटींत 63 ईव्हीएम मशीन हॅक करण्याचा दावा हॅकर करत होता.

काय केला आहे दावा

अमेरिकेतील हॅकर सैयद शुजा याने अमेरिकेतील संरक्षण विभागाचे तंत्रज्ञान वापरुन ईव्हीएम हॅक करता येत असल्याचा दावा केला होता. ‘इंडिया टुडे’ने यासंदर्भात वृत्त दिले होते. सैयद शुजा याने ईव्हीएम हॅक करण्यासाठी 54 कोटींची मागणी केली होती. हॅकर व्हिडिओ कॉलिंगने व्यक्तीशी ईव्हीएम हॅकिंगच्या मुद्द्यावरुन बोलत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे अखेर निवडणूक आयोगाने त्यावर पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे.

हे सुद्धा वाचा

निवडणूक आयोगाने स्पष्ट म्हटले…

महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओतील दावे खोटे आहेत. हा सर्व प्रकार खोटा आणि अप्रमाणित आहेत. ईव्हीएम टँपरफ्रूफ आहे. कोणत्याही नेटवर्कसोबत त्याला जोडत येत नाही. मुंबई सायबर पोलिसांनी या व्हिडिओतील व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

काय आहे व्हिडिओत

व्हिडिओत अमेरिकन हॅकर सैयद शुजा असल्याचा दावा केला जात आहे. तो कोणाच्याही बाजुने निवडणूक निकाल लावू शकत असल्याचा दावा करत आहे. त्यासाठी त्याला व्हीव्हीपॅट मशिनचे नंबर मला हवेत. हे नंबर रिटेरिंग ऑफिसर देईल, असे तो म्हणतो. ईव्हीएम मशीन बंद असतानाही त्याचे ट्रन्समिशन करता येत असल्याचा दावा त्याने केला आहे. ६.५५ मिनिटांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर चांगली रंगली आहे. नेटकरी दोन्ही बाजूंनी दावे, प्रतिदावे करत आहे.