मुंबई– बॉलिवूड गायक (Singer)केके (कृष्णकुमार कुन्नथ) (KK)यांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये (postmortem report)त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले आहे. मंगळवारी झालेल्या कॉन्सर्टमध्ये केके जास्त एक्साईटेड झाले होते, त्यामुळे त्यांचे ह्रद्य ८० टक्के ब्लॉक झाले होते, याच कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना लगेच सीपीआर दिले तर कदाचित त्यांचा प्राण वाचला असता असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.
केके यांच्या ह्रद्यात दुखत होते. मात्र तो पचनाचा त्रास आहे असे समजून त्यांना एंटासिडची औषधे देण्यात आली. इतकंच नाही तर केके यांच्या पत्नीनेही कोलकाता पोलिसांना दिलेल्या माहितीत, ह्रद्यात दुखत असताना केके अनेकदा एंटासिडची औषधे घेत असल्याचे सांगितले. कॉन्सर्टच्या वेळेच्या आधीही केके यांनी त्यांच्या पत्नीला फोन करुन खांदे आणि हात दुखत असल्याचे सांगितले होते. यासह त्यांच्या हॉटेलच्या रुममध्येही एंटासिडची औषधे सापडली आहेत.
पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये तीन महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत.
१. पीटीआय या वृत्तसंस्थेला डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या ह्रद्याच्या डाव्या बाजूला ८० टक्के ब्लॉकेजेस होते. तर इतर ह्रद्यात छोटे छोटे ब्लॉक्स होते.
२. लाईव्ह शोमध्ये केके स्टेजवर फिरत होते आणि गर्दीसोबत डान्स करीत होते. त्यामुळे ते जास्त एक्साईटेड झाले. त्यामुळे त्यांच्या ह्रद्याचा रक्तपुरवठाच थांबला. हेच कार्डिएक अटॅक येण्याचे कारण होते. कार्डिएक अरेस्टमध्ये ह्रद्यात क्षणार्धात काम करण्याचे बंद करते.
३. ह्रद्याचा रक्तपुरवठा थांबल्याने त्यांच्या ह्रद्याचे ठोके अनियमित झाले होते. थोड्याच वळात ते बेशुद्ध पडले आणि त्यांना कार्डिएल अरेस्ट अटॅक आला. त्याचवेळी त्यांना सीपीआर दिले असते तर त्यांचा प्राण वाचू शकला असता.
सीपीआर म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन म्हणजेच रु्गणाला तातडीने द्यावी लागणारी वैद्यकीय प्रक्रिया. कार्डिएल अरेस्टसारख्या स्थितीत यामुळे रुग्णाचा प्राण वाचू शकतो. यात रुग्णाच्या छातीला वारंवार दाबणे किंवा तोंडातून तोंडात श्वास देणे, यासारख्या प्रक्रियांचा समावेश आहे.
काही जणांनी आयोजकांच्या मीस मॅनेजनेंटमुळे केकेंचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. कोलकात्यातील नजरुल स्टेजवर केके परफॉर्म करत होते. बंद सभागृहात एसी काम करत नव्हते आणि गर्दीही जास्त होती, असा आरोप करण्यात येतो आहे. केके यांनी एका दिवसापूर्वीही एसीवरुन तक्रार केली होती. एवढ्या गर्दीत, एसी काम करत नसताना पूर्ण जोशात गाणे म्हणणे, हा हार्ट अटॅक नॉरमल नव्हता, अशा प्रतिक्रियाही येत आहेत.