परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या वक्तव्याने चीनला लागली मिर्ची, भारताबाबत लगेच ओकलं विष

| Updated on: Mar 05, 2024 | 6:37 PM

भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मालदीवचा चोख उत्तर दिले होते. मालदीव आणि भारत यांच्यातील संबंध ताणले जात असताना त्यांनी मोठे वक्तव्य केले होते. दुसरीकडे चीनचा गुलाम होत चाललेले मालदीवच्या राष्ट्राध्यक्ष यांना देखील त्यांनी नाव न घेता चांगलीच चपराक लगावली होती. यावर आता चीनकडून देखील प्रतिक्रिया आली आहे.

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या वक्तव्याने चीनला लागली मिर्ची, भारताबाबत लगेच ओकलं विष
Follow us on

India vs china : चीनचा सरकारी मीडिया ग्लोबल टाइम्सने भारताबाबत पुन्हा एकदा विष पेरले आहे. एकीकडे मालदीव सोबत तणाव सुरु असताना चीन त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. मालदीवमधून भारतीय सैनिकांना माघारी बोलवण्याच्या सूचना केल्यामुळे भारताने देखील आता लक्षद्वीपमध्ये स्वत:ला मजबूत करण्यासाठी धोरणं आखली आहे. भारत आता अॅक्शन मोडवर आला आहे. मालदीवच्या जवळच भारत आपले नवीन नौदल तळ विकसित करत आहे. त्यामुळे चीनला चांगलीच मिर्ची लागली आहे. चीनचे गुलाम झालेले मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे देखील त्यांच्या सूरमध्ये आपला सूर मिसळत आहेत. चीनचा पाठिंबा असल्याने ते आता भारतविरोधी वक्तव्य करु लागले आहेत.

परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

दुसरीकडे ग्लोबल टाइम्सने भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या विधानावर टीका केली आहे. भारत हा शेजारील देशांना मदत करणारे असल्याचे वर्णन एस जयशंकर यांनी  केले होते. त्यावर चीनच्या मीडियाने लिहिले की भारतीय नौदल हिंद महासागरात आपली उपस्थिती वाढवत आहे, कारण मालदीवजवळील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या बेटांपैकी एका बेटावर भारत 6 मार्च रोजी नवीन तळ सुरु करत आहे. भारत मालदीवमधून आपले सैन्य मागे घेत आहे. ग्लोबल टाइम्सने भारताला हिंद महासागराला आपले अंगण म्हणून पाहण्याचा आरोपही केला आहे.

भारताच्या धोरणावर टीका

ग्लोबल टाइम्सने आरोप केला आहे की, “भारत आपली वर्चस्ववादी मानसिकता हिंद महासागरात विस्तारत आहे. या मानसिकतेच्या आधारे भारत लहान दक्षिण आशियाई शेजारी देशांशी संबंध ठेवतो असेही ते म्हणाले. गेल्या वर्षी मालदीवने भारताला सांगितले होते की आपले सैनिक यापुढे मालदीवमध्ये राहू शकत नाहीत. हे भारताच्या वर्चस्ववादी मानसिकतेबद्दल आणि “शेजारी प्रथम” रणनीतीबद्दल दक्षिण आशियाई देशांची नाराजी दर्शवते.” ग्लोबल टाइम्स एवढ्यावरच थांबला नाही. त्यात असा आरोपही करण्यात आला आहे की, “गेल्या काही दिवसांमध्ये भारत स्पष्टपणे “त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होता.

मालदीवचा छळ केल्याचा आरोप

चीनमधील सिचुआन इंटरनॅशनल स्टडीज युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्सचे प्राध्यापक लाँग जिंगचुन म्हणतात की, नवीन तळ कोणत्याही वास्तविक लष्करी महत्त्वापेक्षा राजकीय आहे. मालदीवमध्ये भारताने आपले पाय गमवल्यामुळे तो अजूनही प्रादेशिक वर्चस्व असल्याचा संदेश देऊ इच्छित आहे.

भारत-मालदीव तणाव

भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. या मागे चीनचा हात आहे. कारण चीन समर्थक मुइज्जू सत्तेत आल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध खराब झाले आहेत. चीन मालदीवला पाठिंबा देत आहे. पण मालदीवला हे माहित नाही की चीन कर्जबाजारी करुन कसा छोट्या देशांना आपला गुलाम बनवतो.

भारत का देतो मालदीवला महत्त्व

मालदीवचे हिंद महासागरातील भौगोलीक स्थान खूप महत्त्वाचे आहे. कारण हिंद महासागरातून व्यापार करण्यासाठी देखील मालदीव हे एखाद्या द्वार प्रमाणे आहे. या शिवाय भारताला हिंद महासागरात मालदीवमध्ये राहून चीन आणि इतर देशांंच्या हालचालींवर लक्ष ठेवता येत होते.