भारत आणि चीन सैन्य पुन्हा एकदा आमने-सामने आल्याची घटना घडली आहे. आता ही घटना लडाखमध्ये नाही तर अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात घडली आहे. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिक समोरा-समोर आले होते. दोन्ही सैन्यांमध्ये LAC बाबत वेगवेगळ्या धारणा आहेत, त्यावरुनच अनेकदा हे सैनिक समोरा-समोर येतात, इथं स्पष्ट अशी सीमा नसल्याचं मानलं जातं. दोन्ही बाजूचे सैनिक एकमेकांसमोर आल्यानंतर काही तास वाद झाला, त्यानंतर प्रोटोकॉलच्या आधारावर चर्चेद्वारे हा संघर्ष सोडवला गेला. ( Face off in Arunachal Sector between India and China as there is a difference in perception of LAC)
संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या फेसऑफमध्ये कुणालाही काहीही झालं नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत-चीन सीमेचं अधिकृतपणे सीमांकन करण्यात आलेलं नाही, त्यामुळे दोन्ही देशांमधील LACच्या धारणामध्ये फरक आहे. दोन्ही देशांमधील विद्यमान करार आणि प्रोटोकॉलचे पालन करून, या क्षेत्रांमध्ये शांतता ठेवली जाते.
सैनिकांमध्ये फेसऑफ झाल्यावर काय होतं?
दोन्ही बाजूंचं सैन्य त्यांच्या सीमा क्षेत्रात गस्तीवर असतात, पण काही ठिकाणी ही सीमा स्पष्ट नाही, त्यामुळे बऱ्याचदा दोन्ही सैन्यांचं फेसऑफ होतं. अशावेळी प्रोटोकॉलनुसार बोलणी केली जातात, आणि दोन्हीकडचे सैनिक मागे हटतात. पण, यावेळी माघार घेण्याआधी बराच वेळ वाद झाला. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली होती.
ऑगस्टमध्ये गोगरा हाइट्सजवळ फेसऑफ
ऑगस्ट महिन्यांत भारताने गोगरा हाईट्स भागातून चीनी सैन्याला माघारी पाठवलं होतं. तेव्हा त्यांना आधीच्या ठिकाणावर जाण्यास भारतीय सैन्याने मजबूर केलं. यावेळी चर्चेतून तोडगा काढण्यात आला होता. कमांडर स्तरावर ही बैठक झाली, ज्या वाटाघाटीच्या 12 व्या फेरीत, चीनने 17A या पॉईंटवरुन मागं जाण्यास सहमती दर्शवली होती.
हॉट स्प्रिंगवर अजूनही वाद कायम
भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखच्या सीमेवर एक वर्षाहून अधिक काळ तणाव जैसे थेच आहे. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंनी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. भारत आणि चीन यांच्यात नुकतीच 12 वी बैठकही झाली.पण हॉट स्प्रिंगवर अजूनही तोडगा निघालेला नाही.
हेही वाचा: