Fact Check : आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्याचं खरंच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन? वाचा व्हायरल व्हिडीओ मागील सत्य

| Updated on: Jan 05, 2021 | 11:23 PM

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे (fact check of farmer death due to heart attack at Delhi border)

Fact Check : आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्याचं खरंच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन? वाचा व्हायरल व्हिडीओ मागील सत्य
Follow us on

मुंबई : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्या एका शेतकऱ्याला हृदय विकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू होतो, अशा आशयाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमागील नेमकं सत्य काय आहे? याबाबतची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (fact check of farmer death due to heart attack at Delhi border).

या व्हिडीओबाबत ‘इंडिया टुडे’च्या फेक न्यूज वॉरने स्पष्टीकरण दिलं आहे. संबंधित व्हिडीओत शेतकऱ्यांचा मृत्यू झाला हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. संबंधित व्यक्तीला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मात्र, या व्यक्तीची प्रकृती आता स्थिर आहे. याबाबत पंजाबच्या एका पत्रकारानेदेखील व्हिडीओ शेअर केला आहे (fact check of farmer death due to heart attack at Delhi border).

पंजाबच्या पत्रकाराने शेअर केलेल्या व्हिडीओतील व्यक्ती स्वत:चं नाव लवप्रीत सिंह पाबला असं सांगत आहे. ते स्वत: ऑर्थोपेडिस्ट असल्याचा दावा त्यांनी व्हिडीओत केला आहे. व्हिडीओत ते या घटनेची माहिती देताना दिसत आहेत. या व्हिडीओत ते व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील व्यक्ती मृत्यू झाल्याचा दावा चुकीचा असल्याचं सांगत आहेत. संबंधित व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही, असं ते स्पष्ट करत आहेत.

इंडिया टुडेने डॉक्टर पाबला यांची प्रतिक्रिया घेतली. यावेळी त्यांनी संबंधित शेतकरी आपल्यासमोरच जमिनीवर पडला, असं त्यांनी सांगितलं. ही घटना 3 जानेवारीची आहे, असं त्यांनी सांगितली. त्यांचं पंजाबच्या होशियापूर येथे हॉस्पिटल आहे.

“आमची टीम दर आठवड्याच्या सुट्टीत दिल्ली सीमेचा दौरा करते. आमच्या टीमने त्या वृद्धावर उपचार केला होता. त्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर कमी झालं होतं. ती व्यक्ती शुद्धीवर आल्यानंतर त्यांना अमृतसर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं”, असं पाबला यांनी सांगितलं.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत हृदयविकाराचा धक्का येऊन जमिनीवर पडलेल्या व्यक्तीचं नाव इक्बाल सिंह असं आहे. या व्यक्तीवर अमृतसरच्या रंधावा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना हृदय विकाराचा झटका आला होता. मात्र, त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती समोर आली आहे. ते उत्तर प्रदेशात अधिकारी पदावर कार्यरत होते. मात्र, ते निवृत्त झाले. त्यांना सध्या काही कारणास्तव पेन्शन मिळत नाही. त्यामुळे ते सतत चिंतेत असतात, अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी