नवी दिल्ली – भारतातील वाढत्या हिंसाचाराच्या (increase in violence)घटनांमुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान होते आहे. गेल्या काही वर्षआंमधील हिंसाचारांच्या घटनांवर नजडर टाकली, तर त्यात देशाचे अब्जावधींचे (Costs to India)नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यात सीएए-एनआरसी कायद्याला झालेला विरोध, शेतकरी आंदोलनावेळी झालेली हिंसा, पैगंबर वादग्रस्त वक्तव्याचा वाद आणि आता भारतीय सैन्यदलात नव्याने लागू केलेल्या अग्निपथ (Agneepath )योजनेला देशभरात होत असलेला विरोध, या सगळ्यातून देशाचे मोठे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे जागतिक शांतता क्रमवारीत म्हणजेच ग्लोबल पीस इंडेक्समध्ये भारत 163देशांच्या यादीत 135व्या स्थानावर आहे.
आपल्या देशात झालेल्य़ा या हिंसाचारात भारताचे 646अब्ज डॉलर्सचे नुकसान झालेले आहे. खरंतर या पैशांनी देशाच्या बजेटमध्ये वाढ करता येणे शक्य होते. अनेक कल्याणकारी योजना राबवता येऊ शकल्या असत्या. मात्र हिंसाचाराने आणि त्यातील जाळपोळीच्या घटनांमुळे सर्व नष्ट केले आहे.
देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच जीडीपीच्या सहा टक्के वाटा हा हिंसाचारात नष्ट होतो. गेल्या काही वर्षांत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर देशात होणाऱ्या हिंसाचारात वाढ झाल्याचे दिसते आहे. यामुळे सातत्याने संचारबंदी, इंटरनेट बंदी यासारखी कठोर पावले उचलावी लागतात. याचबरोबर दहशतवादी आणि नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांमुळेही देशाचे मोठे आर्थिक नुकसान सातत्याने होत असते. या सगळ्या घटनात प्रत्यक्षात होणारे मालमत्तेचे आणि जिवीतहानीच्या नुकसानासह अप्रत्यक्षपणेही देशाचे मोठे नुकसान होत असते.
भारताची शेजारची राष्ट्रे पाकिस्तान आणि चीन या यादीत अनुक्रमे 54आणि 138व्या स्थानावर आहेत. भारत, चीन आणि पाकिस्तानचा विचार केल्यास, भारताला या हिंसाचारात 6टक्के जीडीपीचे नुकसान झाले आहे. या हिंसाचाराची किंमत 646अब्ज डॉलर्स इतके आहे. तर पाकिस्तानात हिंसाचारामुळे 8टक्के जीडीपीचे नुकसान होते, यात 80.3अब्ज डॉलर्सचे नुकसान होते. तर चीनमध्ये जीडीपीच्या 4टक्के हिंसाचारात जळून जातात. हा आकडा 1049अब्ज डॉलर्सच्या घरात आहे.
2022साली जाहीर झालेल्या अहवालानुसार आइसलँड हा जगातील सर्वात पहिला शांत देश आहे. दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंड आणि तिसऱ्या स्थानी आयर्लंड आहे. 163देशांच्या या यादीत अफगाणिस्थान सर्वात तळाशी आहे. त्याच्यावर येमेन आणि सीरियाचा क्रमांक आहे. हे तिन्ही देश सर्वाधिक गृहकलह आणि दहशतवादाने होरपळलेले आहेत.
2022च्या या अहवालानुसार, हिंसा आणि आंतरिक संघर्षाचा सामना करणाऱ्या देशांची संख्या 29वरुन 38वर पोहचलेली आहे. मात्र अंतर्गत संघर्षात मारल्या गेलेल्यांची संख्या 2017पेक्षा कमी झाली आहे. अफ्रिकेनंतर दक्षिम आशिया हे जगातील सर्वाधिक अशांत क्षेत्र आहे. सीरिया, दक्षिण सूदान आणि अफ्रिकी गणराज्य देशांत हिंसेमुळे सर्वाधिक आर्थिक नुकसान झालेले आहे. तर आईसलँड, कोसोवो आणि स्वित्झर्लंड हे सर्वात कमी प्रभावित देशांत येतात.