चंदिगड : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आण हरियाणाच्या शेतकऱ्यांचं गेल्या 28 दिवसांपासून आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. या आंदोलनाला देशभरातील शेतकऱ्यांचं समर्थन मिळत आहे. दरम्यान, 28 दिवसांनंतरही शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने आता शेतकरीदेखील आक्रमक होताना दिसत आहे. त्याचाच प्रत्यय आज हरियाणाच्या जींद जिल्ह्यात पाहायला मिळाला. शेतकऱ्यांनी जींदच्या उचाना भागात उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या हॅलिपॅडच्या जागा फावड्याने खोदली. त्याचबरोबर ‘दुष्यंत चौटाला गो बॅक’ अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या (Farmers dug Dushyant Chautalas helipad).
“दुष्यंत चौटाला जोपर्यंत शेतकऱ्यांचं समर्थ करणार नाही तोपर्यंत त्यांना या क्षेत्रात घुसू देणार नाही. त्यांनी राजीनामा देवून शेतकऱ्यांसोबत यावं. अन्यथा जो नेता या भागात येईल त्यालादेखील असाच विरोधा करण्यात येईल”, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली (Farmers dug Dushyant Chautalas helipad).
दु्ष्यंत चौटाला आज हेलिकॉप्टरने उचाना येथे येणार होते. त्यासाठी उचाना येथे हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध पाहता त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. दरम्यान, त्यांचा दौरा का रद्द करण्यात आला याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दुष्यंत चौटाला जींद जिल्ह्यातील उचाना हल्के विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांचा उचाना हल्के येथील दौरा हा प्रस्तावित होता.
‘आजोबाने शेतकऱ्यांसाठी खुर्चीला लाथ मारली, नातवाने मात्र शेतकऱ्यांना लाथ मारली’
“दुष्यंत चौटाला यांच्या आजोबांनी म्हणजे माजी उप-पंतप्रधान देवीलाल यांनी शेतकऱ्यांसाठी खुर्चीला लाथ मारली होती. मात्र, दुष्यंत चौटाला यांनी खुर्चीसाठी शेतकऱ्यांना लाथ मारली. जोपर्यंत ते शेतकऱ्यांसाठी आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत त्यांना हल्केमध्ये प्रवेश करु देणार नाहीत”, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
मनोहरवाव खट्टर यांचं वादग्रस्त वक्तव्य
दुसरीकडे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शेतकरी आंदोलनावर वादग्रस्त विधान केलं आहे. “आम्ही आजकल तमाशा बघतोय. कायदा रद्द करण्यासाठी दबाव आणला जातोय. खरंत ही लोकशाही आहे? धांगडधिंगा चालणार नाही आणि त्यांना समर्थन देणं देखील चालणार नाही. आपली बाजू सभ्यपणे मांडण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. लोकशाहीत त्याचंच स्वातंत्र्य दिलं गेलं आहे”, असं खट्टर म्हणाले आहेत.
हेही वाचा : UK वरुन येणाऱ्यांसाठी राज्य सरकारची नियमावली, सक्तीने 7 दिवस पेड क्वारंटाईन