उत्तर प्रदेश : मागच्या काही दिवसांपासून भटक्या जनावरांच्या (stray animals) मृत्यूचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे रेल्वे (Railway) आणि आरपीएफची (RPF) डोकेदुखी अधिक वाढली असल्याचे अधिकारी सांगत आहे. रेल्वेच्या अपघातामध्ये आतापर्यंत अनेक भटक्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने यांचं कारण शोधून काढले आहे. आरपीएफ पोलिसांनी रेल्वेच्या ट्रॅकशेजारी बंदोबस्त वाढवला आहे.
भटकी जनावर शेतकऱ्यांचं अधिक नुकसान करीत असल्याची अनेक दिवसांपासूनची शेतकऱ्यांची ओरड आहे. नुकसानीला कंटाळलेले अनेक शेतकऱ्यांनी कंठाळून एक आयडीया केली आहे. शेतकरी रेल्वेच्या रुळावरती ओला चारा टाकत आहेत. ओला चारा खाण्यासाठी आलेले जनावर अपघातामध्ये मृत्यूमुखी पडत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अधिक बंदोबस्त वाढवला असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
उत्तर प्रदेश राज्यात मागच्या दोन महिन्यात अपघातामध्ये अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. बिलपूर, मीरानपूर कटरा, टिसुआ, विशारतगंज, रामगंगा, सीसीगंज या परिसरात पोलिसांनी अधिक बंदोबस्त वाढवला आहे. कारण मागच्या काही दिवसात अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत.
आरपीएफ पोलिसांनी हिरवा चारा टाकणाऱ्या शेतकऱ्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. तसेच जो कोणी हिरवा चारा टाकताना निर्दशनास येईल, त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.